अलविदा एमएस पेंट : 32 वर्षानंतर विंडोजमधून सॉफ्टव्हेअर वगळणार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

विंडोज 10 अपडेटच्या निमित्ताने हे डेस्कटॉपचे फीचर वगळण्यात येणार आहे अशी घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे. यापुढे या सॉफ्टव्हेअरसाठी कोणतीही देखभाल किंवा याचा विकास होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मुंबई : अगदी चिमुरड्यांपासून ते जेष्ठांमध्ये विंडोजमध्ये सर्वात लोकप्रिय फीचर असलेल्या एमएस पेंटची मायक्रोसॉफ्टने साथ सोडली आहे. सर्वांच कॉम्प्युटर वापरातली लहानपणातला सगळ्यात आवडत फीचर म्हणजे मायक्रोसॉफ्ट पेंट. विंडोजच्या पहिल्या व्हर्जनपासून गेली 32 वर्षे साथ देणार फीचर अखेर नामशेष होणार आहे.

विंडोज 10 अपडेटच्या निमित्ताने हे डेस्कटॉपचे फीचर वगळण्यात येणार आहे अशी घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे. यापुढे या सॉफ्टव्हेअरसाठी कोणतीही देखभाल किंवा याचा विकास होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एमएस पेंटसोबतच आणखी काही फीचर्सही वगळण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. आऊटलुक एक्सप्रेस, रिडर एप, रिडिंग लिस्ट यासारखे फीचरही वगळणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे.

मायक्रोसॉफ्टने 1985 मध्ये पहिल विंडोज व्हर्जन आणल होत. तीस वर्षाहून अधिक साथ देणाऱ्या सॉफ्टव्हेअरची आता साथ सोडण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. गेल्याच वर्षी मायक्रोसॉफ्टच्या रडावर एमएस पेंट हे सॉफ्टव्हेअर होत. त्यामुळेच कंपनीने थ्री डी पेंटच अद्ययावत अस फीचर विंडोजसाठी दाखल केले. थर्ड डायमेंशनल इमेज तयार करण या फीचरचा भाग होता. एमएस पेंटनंतर एडॉब फोटोशॉप हे लोकप्रिय व्हर्जन आहे खर, पण एमएम पेंटच्या निमित्ताने असणारा नोस्टॅलजियाच आहे खरा. अगदी तीन वर्षाच्या चिमुरड्यापासून ते आपल्या जेष्ठ नागरिकांना हाताळायला सोप अस हे सॉफ्टव्हेअऱ सोप होत. ट्विटरकरांनीही एमएस पेंट सॉफ्टव्हेअरसाठी मोठ्या प्रमाणावर ट्विटस केल्या आहेत. काही निवडक ट्विट्स

Children of the future will never know the joy of spending hours doing
this on Microsoft Paint #MSpaint
@McDoFi

@Economistaken
RIP MS Paint. RIP our childhoods

R.I.P. My childhood with Microsoft Paint 1998-2017. :'(. #MSpaint

@alexlovesrolos
R.I.Paint, in loving memory of #MSpaint


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Microsoft Paint to be killed off after 32 years