esakal | तुमचा Windows PC लवकर अपडेट करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

microsoft security update

तुमचा Windows PC लवकर अपडेट करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मायक्रोसॉफ्टने सर्व विंडोज वापरकर्त्यांना ताबडतोब त्यांची सिस्टम अपडेट करण्याचा इशारा जारी केला आहे. कंपनीने विंडोज वापरकर्त्यांसाठी इंस्टंट सेक्युरिटी अपडेट आणले आहे. जे मागील आठवड्यात आलेल्या Print Nightmare समस्या दूर करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर वापरकर्त्यांनी हे अपडेट केले नाही तर त्यांच्या पीसीला हॅकिंग किंवा सिक्युरिटीचा धोका होऊ शकतो. (microsoft-security-update-to-fixes-printnightmare-security-issue-update-windows-pc)

टेक जायंटने कंपनी मायक्रोसॉफ्टने सांगितले की हे सुरक्षा अपडेट 6 जुलै रोजी लाँच केले गेले. जे CVE-2021-1675 बग विरूद्धात सुरक्षा देईल. या व्यतिरिक्त, विंडोज प्रिंट स्पूलर सर्विसमध्ये असलेला 'प्रिंट नाइटमेयर' बग देखील फिक्स केली आहे, ज्याला CVE-2021-34527 असे नाव देण्यात आले

कंपनीने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे, मायक्रोसॉफ्टला रिमोट कोड एक्झिक्युशन त्रुटीबद्दल माहिती आहे आणि ती कंपनी याची चौकशी करीत आहे. विंडोज प्रिंट स्पूलरला प्रभावित करणारा हा दोषाला CVE-2021-34527 नंबर दिला गेला आहे. कंपनीने म्हटले होते की हा बग लवकरच फिक्स केला जाईल आणि आता त्यासंदर्भातले अपडेट लॉंच केले गेले आहे. प्रिंट स्पूलर सर्व्हिस ही एक सॉफ्टवेअर आहे, जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टममधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

काय समस्या होती?

विंडोजच्या प्रिंट्स नाईटमेअरमध्ये काही त्रुटी समोर आल्या होत्या. यामुळे हॅकर्स याचा गैरफायदा घेण्याची शक्याता होती. हॅकर्स रिमोट कोड एक्झिक्यूट करू शकता. ज्याद्वारे ते संगणकावर कोणताही प्रोग्राम इंस्टॉल करू शकतात. मात्र मायक्रोसॉफ्टने नवीन सुरक्षा पॅचच्या मदतीने या त्रुटी दुरुस्त केल्या आहेत.

हेही वाचा: तुम्हाला Caller Id ब्लॉक करायचा असेल तर हे नक्की वाचा

हॅकर्स गैरफायदा घेऊ शकतात

या बगच्या मदतीने, हॅकर्स वापरकर्त्याची सिस्टीम नियंत्रित किंवा लॉक देखील करु शकतात. या व्यतिरिक्त ते एडमीन राइटसह नवीन खाती देखील तयार करु शकतात. यामुळे एखाद्या हॅकिंगची मोठी घटना घडू शकते. हा मुद्दा समोर आल्यानंतर मायक्रोसॉफ्टने त्याची दखल घेतली. जेव्हा विंडोज प्रिंट स्पूलर योग्यरित्या काम करत नसेल तेव्हा रिमोट कोड एक्झिक्यूट केला जाऊ शकतो.

मायक्रोसॉफ्टने सुरक्षा पॅच दुरुस्त केला

नवीन सुरक्षा पॅचसह मायक्रोसॉफ्टने ही समस्या फिक्स केली आहे. जर तुम्ही विंडोज यूझर असाल तर तुमची सिस्टम सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला ताबडतोब पीसीवर अपडेट इन्स्टॉल करण्याची गरज आहे. कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे की सर्व विंडोज वर्जन सुरक्षित आहेत आणि त्यांनी त्वरित अपडेट इंस्टॉल केले पाहिजे. जर तुम्हाला सिक्योरिटी अपडेट मिळाले नसल्यास, आपल्याला आणखी थोडा वेळ थांबावे लागेल. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, विंडोजच्या समर्थित वर्जन ज्यामध्ये 6 जुलै पर्यंत सुरक्षा अपडेट उपलब्ध नाहीत ते 6 जुलै नंतर अपडेट केली जातील.

(microsoft-security-update-to-fixes-printnightmare-security-issue-update-windows-pc)

हेही वाचा: ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार

loading image