esakal | ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार

ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ट्वीटरने (twitter) प्रायवसी संरक्षित ठेवण्यासाठी काही नवीन फिचर्स लॉंच केले आहेत. यात यूजर्स प्रायवसी आयिडया आणि एक प्रायवसी चेकइन (privasy) अशा दोन प्रकारच्या नव्या फीचर्सचा समावेश आहे. या दोन्ही फीचर्समुळे ट्वीटर अकाऊंट सिक्यूर (security) राहण्यास मदत होणार आहे. शिवाय या नव्या अपडेटमुळे यूजर्स ट्वीटर अकाऊंटची सर्च लिस्ट हाईड ठेऊ शकतात. याचा फायदा मायक्रो ब्लॉकिंग वेबसाइटवर (block website) ट्रोल होणाऱ्या ट्वीटर अकाऊंट यूजर्सना होऊ शकतो.

हेही वाचा: Apple iPad चे 'हे' नवीन मॉडेल्स लवकरच होणार लॉन्च

युजर्सची अनेक प्रकारची प्रायवसी जाणून घेण्यासाठी ट्वीटरचे हे नवीन चेकइन (check-in) फीचर उपयोगी पडणार आहे. यामुळे ट्वीटर प्लॅटफॉर्मच्या सिक्युरीटीसह एक यूजर कोणत्या पद्धतीने विचार करतो याची माहिती मिळणार आहे. यामध्ये ट्वीट कुणी पहावे किंवा पाहु नये हा निर्णय अंतिमत: यूजर्सचा असणार आहे. त्याला एखादे संबधित ट्वीट काही ठराविक युजर्सना एक्सेस करायचे असल्यास तो तसे करु शकतो. याशिवाय कोणी त्याला डायरेक्ट मेसेज करावा अथवा करु नये याचा सर्वाधिकार त्याच्याकडे असणार आहेत.

हेही वाचा: फोन विकत घेताना 'ही' वैशिष्ट्ये आहेत भारतीयांची पहिली पसंती

साधारणत: प्रायवसी ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाला हवी असते. परंतु हे सर्वत्र हे एकसमान लागू होत नाही. यामुळे ट्वीटरकडून प्रायवसी यासंबधित अनेकांकडून आयडिया आणि फिडबॅक घेतले जात आहेत. यामध्ये अनेकांनी सांगितले की ट्वीटर अकाऊंट आम्हांला हाईड करायचे नाही. नव्या अपडेटमध्ये युजर्सना हा अधिकार दिला आहे की, त्यांच्या अकाऊंट किंवा मेलवरुन मोबाईल नंबर सर्च करावा. अशाच काही युजर्सची नावे सर्च केली जात असून अशा प्रकारचे टेस्टींग सुरु आहे.

loading image