Microsoft AI Training : भारतातील एक लाख डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट देणार एआय प्रशिक्षण! 'ऑडेसी इनिशिएटिव्ह'ची घोषणा

AI Odyssey Initiative : या माध्यमातून डेव्हलपर्सना एआय तंत्रज्ञानाचा आपल्या कामासाठी आणि बिझनेस गोल्स पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.
Microsoft AI Training
Microsoft AI TrainingeSakal

Microsoft to train Indian Developers : जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असणारी मायक्रोसॉफ्ट ही भारतातील एक लाख तरुणांना एआयचे प्रशिक्षण देणार आहे. सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली. एआय ऑडेसी इनिशिएटिव्हच्या (AI Odyssey Initiative) माध्यमातून कंपनी एआय तंत्रज्ञान आणि टूल्सची माहिती डेव्हलपर्सना देईल.

"या प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेव्हलपर्सना एआयबाबत माहिती देण्यात येईल. सोबतच एआय तंत्रज्ञानाचा आपल्या कामासाठी आणि बिझनेस गोल्स पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो याबाबतही प्रशिक्षण देण्यात येईल." असं कंपनीने स्पष्ट केलं. बिझनेस स्टँडर्डने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Microsoft AI Odyssey)

हे एक महिन्याचं प्रशिक्षण सर्वांसाठी खुलं असणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींना कोणत्याही प्रकारचा पूर्व अनुभव असणं गरजेचं नाही. डेव्हलपर्सना केवळ एआय ऑडेसी पोर्टलवर (AIOdyssey portal) जाऊन यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर लर्निंग मॉड्यूल आणि अभ्यासाचे साहित्य याचा अ‍ॅक्सेस सर्व प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

Microsoft AI Training
Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी डील; मायक्रोसॉफ्ट विकत घेणार 'कॉल ऑफ ड्यूटी', 'कँडी क्रश' बनवणारी कंपनी

या प्रशिक्षणाची नोंदणी सुरू झाली असून, यातील दोन लेव्हल महिना अखेरीपर्यंत पूर्ण कराव्या लागणार आहेत. यातील पहिल्या लेव्हलमध्ये अझुरे एआय सुविधा कशा प्रकारे वापरायच्या याबाबत माहिती मिळेल. तर दुसऱ्या लेव्हलमध्ये इंटरॅक्टिव्ह लॅबसोबत एक इंटरॅक्टिव्ह असेसमेंट सेशन होईल. यानंतर प्रशिक्षणार्थींना मायक्रोसॉफ्ट अप्लाईड स्किल क्रेडेन्शिअल्स मिळतील. यामधील ठराविक विजेत्यांना फेब्रुवारीमध्ये बंगळुरूत होणाऱ्या मायक्रोसॉफ्ट एआय टूरचे व्हीआयपी पासही मिळणार आहेत.

"एआय हेच भविष्य आहे, आणि भारतातील टेक टॅलेंट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मायक्रोसॉफ्टच्या या कोर्समुळे डेव्हलपर्सना आपल्या क्रिएटिव्हिटीला चालना देता येणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे", असं मत मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या एमडी इरिना घोस यांनी व्यक्त केलं. (AI is the future)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com