Microsoft's Bing chatbot : मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटबॉटवर आता AI-image क्रिएट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Microsoft's Bing chatbot

Microsoft's Bing chatbot : मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटबॉटवर आता AI-image क्रिएट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

ChatGPT ला घेऊन अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांनी ChatGPT सारखा चॅटबॉट आणला आहे जो एक आर्टिफिशिअल इंटेलिजेंसवर आधारीत आहे. Microsoft ने आता नव्या चॅटबॉट Bing ला लाँच केलंय. सोबतच याचा बीटा वर्जनही आधीच रिलीज करण्यात आला होता ज्याचा काही लोक वापर करत आहे.

मायक्रोसॉफ्टने मंगळवारी आपल्या नव्या चॅटबॉट Bing मध्ये AI-पावर्ड इमेज क्रिएट करण्याचं ऑप्शल लाँच केलंय. Bing इमेज क्रिएटरला OpenAI च्या DALL-E मॉडेलद्वारे लाँच करण्यात आलंय. Bing इमेज क्रिएटर आता हवी तशी इमेज क्रिएट करू शकणार आहे. (Microsofts Bing chatbot adding an AI powered image creator )

यूजर्ससाठी कंपनीने बिंग सर्च इंजिन मध्ये AI-image generator फीचर्स आणलंय. या फिचरला कंपनीने बिंगच्या इमेज सर्च सेक्शनमध्ये अपडेट केलंय.

काय आहे AI-image ?

कंपनीद्वारा बिंगमध्ये जोडण्यात आलेलं हे नवं फिचर यूजर्सच्या प्रश्नावर आधारीत राहणार आहे. या टूलच्या मदतीने यूजर्सनी विचारलेल्या प्रश्नांनी निगडीत इमेज जेनेरेट केली जाणार.

जसे की यूजरने कोणताही प्रश्न विचारला तर जेनेरेटर या संबंधीत मिळती जुळती एक इमेज तयार करणार. त्यानंतर या इमेजसाठी यूजरला आपला प्रश्न टेक्स बॉक्सद्वारे पुट इन करावा लागतो.

AI-image जेनेरेट करण्यासाठी यूजर कडे इंटरनेट असणे आवश्यक आहे, सोबतच मायक्रोसॉफ्ट अकाउंटही असणे गरजेचे आहे. कोणत्याही वेब ब्राउजरवर बिंगची ऑफिशियल वेबसाइटवरुन तुम्ही या टूलचा वापर करू शकता.