esakal | मोबाईल डेटाच्या सुरक्षिततेसाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल डेटाच्या सुरक्षिततेसाठी...

स्मार्टफोन बदलल्यास संपर्कक्रमांक, ई-मेल आयडी आणि अन्य महत्त्वाच्या पीडीएफ फाइल्स, फोटो कोठे साठवायचे, याची समस्या प्रत्येकाला भेडसावते. त्यासाठी पुण्यातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले डॉ. सारंग लाकरे यांनी ‘इनटच’ स्टार्टअप सुरू केले. त्याच्या साह्याने संपर्क क्रमांकासह तुमच्या मित्र, नातेवाईक आणि अन्य लोकांचे मोबाईल क्रमांकही ‘क्‍लाउड सर्व्हर’वर साठवून सुरक्षित करता येणार आहेत.

मोबाईल डेटाच्या सुरक्षिततेसाठी...

sakal_logo
By
यशपाल सोनकांबळे

मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो, पीडीएफ फाइल्स, ई-मेल कुठे साठवायचे याची चिंता सतावते. त्यातूनच व्यक्तिगत आणि समूहातील सर्वांचे मोबाईल क्रमांकासह महत्त्वाचे फोटो, फाइल्स क्‍लाउड सर्व्हरच्या साह्याने साठविता आले, तर ही संकल्पना डॉ. लोकरे यांच्या डोक्‍यात आली व २०१२मध्ये ‘इनटच’ संकेतस्थळ सुरू झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर २०१५मध्ये मोबाईल ॲप सुरू केले. व्हॉट्‌सॲपप्रमाणे ग्रुप करून मर्यादित मेंबर्सना ॲड करून कुठलीही कंपनी, मित्रांचा किंवा नातेवाइकांचा समूह सुरक्षितपणे एकमेकांना मोबाईल क्रमांक साठवू शकतात, फोटो, मीटिंग्सची माहिती, पीडीएफ फाइल्स पाठवून ती ‘इनटच’च्या क्‍लाऊड सर्व्हरवर साठवू शकतात. त्यामध्ये अपडेट मिळविता येतात. साठवणुकीसाठी ‘मेमरी स्टोअरेज’चे बंधन नसल्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलची मेमरी वापरली जात नाही. स्मार्टफोन बदलला तरी तुमची माहिती ‘इनटच’च्या माध्यमातून पुन्हा रिस्टोअर करू शकता. सद्यःस्थितीत ‘इनटच’ ॲपचे १५ लाखांहून जास्त यूझर्स आहेत.’’

‘इनटच’ॲपच्या माध्यमातून सेव्ह केलेली प्रत्येक माहिती क्‍लाउड सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यात येते. साठविलेली माहिती कुठल्याही वेळी, कोणत्याही सदस्याला उपलब्ध करता येते. ॲटो-बॅकअपची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल हरवला, तरी ‘डेटा क्‍लाउड’वर सेव्ह असल्यामुळे डेटालॉसची भीती नाही. ‘डेटा प्रायव्हसी’ची हमी, सदस्यांच्या माहिती गोपनीय ठेवण्याची हमी दिली जाते, तसेच जाहिरातमुक्त ॲप असल्यामुळे वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येत नाही. 


ॲपची वैशिष्ट्ये

  • गुगल प्लेस्टोअर, आयओएस, ब्लॅकबेरीवर ॲप उपलब्ध.
  • फ्री डाउनलोडिंग (काही सेवांकरिता नाममात्र शुल्क).
  • मोबाईल क्रमांक, ई-मेल, फोटो, पीडीएफ फाईल्स क्‍लाउड सर्व्हरवर साठवणूक.
  • व्यक्तिगत आणि समूहांमधील सर्वांचे मोबाईल क्रमांक आणि सर्व फाइल्स सुरक्षित.
  • अमर्यादित मेंबर ग्रुपमध्ये ॲड करता येणार.
  • क्‍लटर किंवा फॉरवर्डेड मेसेज टाकता येणार नाही.
  • ट्विटर, फेसबुक, व्हॉट्‌सॲपला जोडणे शक्‍य.
  • शंभर टक्के सुरक्षित ॲप.
loading image