esakal | Pegasus स्पायवेअरने तुमचा स्मार्टफोन संक्रमित केलाय का? फ्रीमध्ये घ्या जाणून
sakal

बोलून बातमी शोधा

Pegasus

Pegasus ने तुमचा स्मार्टफोन संक्रमित केलाय का? असं घ्या जाणून

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पेगॅससच्या (Pegasus) माध्यमातून पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर देशात आता सरकारवर विरोधकांनी टीका सुरु केली आहे. दरम्यान Pegasus हे एक इस्त्रायली NSO ग्रुपने तयार केलेले स्पायवेअर (spyware) आहे, जे स्मार्टफोनमध्ये हेरगिरी करण्यासाठी वापरले जाते. हे जगातील सर्वात धोकादायक स्पायवेअर असून याच्या मदतीने काही ठराविक वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटावर पाळत ठेवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

या टूलच्या मदतीने हॅकर्स एसएमएस, कॉन्टॅक्ट लिस्ट, कॉल हिस्ट्री, ई-मेल, सर्व रेकॉर्ड, मेसेजींग अॅप्स आणि ब्राउझिंग याबद्दलची माहिती हॅक करू शकतात. याशिवाय हे आपल्या फोनच्या कॅमेर्‍यावर नियंत्रण ठेवून फोटो आणि कॉल रेकॉर्ड करू शकते. आश्चर्याची गोष्ट अशी की या टूलच्या वापराने कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीचा स्मार्टफोन हॅक केला जाऊ शकतो आणि या बद्दल वापरकर्त्यास देखील माहित नसते. आपल्या स्मार्टफोनला पेगासस स्पायवेअरने संसर्गित केला आहे की नाही हे आता आपल्याला माहिती होऊ शकते.

या धोकादायक स्पायवेअरचा मागोवा घेणे हे खूपच अवघड आहे, जरी असे एक साधन उपलब्ध आहे जे स्मार्टफोन वापरकर्त्यांकडे त्यांचे डिव्हाइस पेगासस स्पायवेअरने संक्रमित आहे किंवा नाही हे सांगू शकेल. टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या रिसर्चर्सनी टूल विकसीत केले आहे जे वापरकर्त्यांना त्यांचे फोन पेगासस स्पायवेअरने संक्रमित आहे की नाही हे ओळखण्यास मदत करेल. या टूलला मोबाईल व्हेरीफिकेशन टूलकिट ( mobile verification toolkit) असे म्हटले जाते.

हेही वाचा: Pegasus पाळत कशी ठेवतं? महागड्या टेक्नॉलॉजीसाठी कोट्यवधींचा खर्च

मोबाइल व्हेरीफिकेशन टूलकिट (MVT) काय आहे?

एखाद्या डिव्हाइसवर छेडछाड केली गेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी आणि डिव्हाइसला पेगासस स्पायवेअरने संक्रमित केले आहे की नाही हे शोधण्यासाठी अ‍ॅम्नेस्टीच्या संशोधकांनी मोबाइल टूलकिट टूलकिट डिझाइन केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, अँड्रॉइडपेक्षा आयफोन वर स्पायवेअर असण्याची अधिक शक्यता असते. हे टूलकिट indicators of compromise (IOC) बद्दल अंदाज लावण्यास सक्षम आहे.

MVT आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर कसे काम करते?

MVT आयफोन बॅकअप read करु शकते आणि डिव्हाइसमध्ये छेडछाड झाली आहे का याचा शोध घेऊ शकते, जसे की बॅकअपमध्ये पेगासस-संबंधित डोमेन आढळू शकतात, जेणेकरून वापरकर्त्यास माहिती होते की डिव्हाइसमध्ये असे कोणतेही indicators of compromise (IOC) अस्तित्वात आहे किंवा नाही. जेव्हा अँड्रॉईड डिव्‍हाइसेसचा प्रश्न येतो तेव्हा हे साधन एसएमएसद्वारे पाठविलेल्या NSO ग्रुप कडून डोमेनच्या कोणत्याही लिंकसाठी आपल्या बॅकअपची तपासणी करते, आपल्या डिव्हाइसवरील सर्व अॅप्स सोबत छेडछाड केली गेली आहे की नाही याची तपासणी त्याद्वारे केली जाते.

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

MVT उपलब्धता आणि किंमत

अ‍ॅम्नेस्टीने GitHub वर फ्रीमध्ये MVT दिले आहे, परंतु सध्या ते कमांड-लाइन इंटरफेस (CLI)वर अवलंबून आहे, ज्याचा अर्थ असा आहे की सामान्य वापरकर्त्यांना हे फारसे वापरासाठी अनुकूल नाही. या ठिकाणी संशोधकांनी अधिकृत कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत, ज्यामध्ये हे टूलकिट कसे काम करते आणि ते कसे वापरावे हे स्पष्ट केले आहे.

loading image