चंद्र शोषतोय पृथ्वीवरील पाणी - शास्त्रज्ञांचा अभ्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

moon

चंद्र शोषतोय पृथ्वीवरील पाणी - शास्त्रज्ञांचा अभ्यास

मुंबई : चंद्रावर पाणी असल्याचा शोध २००८ साली भारताच्या चांद्रयान मोहिमेत लागला. त्यानंतर आता हे पाणी कुठून येते याचा शोध लागला आहे. हे पाणी पृथ्वीवरून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

University of Alaska Fairbanks Geophysical Instituteच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण पृथ्वीच्या वरच्या स्तरातील वातावरणातून निसटत आहेत आणि ते चंद्रावर जाून साचत आहेत. चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील पाण्याच्या स्रोताचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला.

चंद्राच्या हवाविरहीत जगातील पाण्याचे साठे वापरण्यास कठीण आहेत कारण, अमेरिका, युरोप आणि चीन येथील अंतराळवीर चंद्रावरून उतरून पृष्ठभाग तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर बेस कॅम्प तयार करणार असून पृथ्वीवरून चंद्रावर गेलेल्या पाण्याचे कण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

पृथ्वीच्या वातावरणातून उडत गेलेल्या कणांपासून तयार झालेल्या पाण्याचा ३ हजार ५०० घन किमीमीटर पृष्ठभाग चंद्रावर असण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणातून पाण्याचे कमीत कमी किती कण बाहेर पडू शकतात आणि त्यापैकी किती चंद्रावर पोहोचू शकतात यांची तुलना करून हा अंदाज लावण्यात आला आहे.

पृथ्वीच्या magnetosphereच्या शेपटातून चंद्र प्रवास करत असताना पृथ्वीच्या वातावरणातील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण उडून चंद्रावर जातात. चंद्राच्या मासिक पाच दिवसीय फेरीच्या वेळी ही प्रक्रिया घडते. यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर चंद्राचा प्रभाव पडतो. परिणामी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे कण चंद्रावर आदळतात आणि त्यापासून पाणी तयार होते.

Web Title: Moon Pulling Water From Earth Scientist Finds A Unique Lunar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :watermoonEarth
go to top