Common Password : जगातील कोट्यवधी लोकांचा एकच पासवर्ड; तुमचा तर नाही ना हाच?

Common Passwords List : जगातील 31 टक्के पासवर्ड हे सांख्यिक म्हणजेच आकड्यांनी बनलेले आहेत
Most Common Password
Most Common PasswordeSakal

Most Common Password : जगातील सर्वात सामान्य पासवर्ड्सची यादी समोर आली आहे. यामध्ये भारतासह जगभरातील लोकांनी वापरलेले अगदी कॉमन पासवर्ड दिलेले आहेत. यावर्षी जगात सर्वाधिक वापरण्यात आलेला पासवर्ड हा 123456 असल्याचं स्पष्ट झालं आहे. नॉर्डपास या कंपनीने हा अहवाल सादर केला आहे.

सध्या आपले सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. काही खरेदी करायचं असेल, गुंतवणूक करायची असेल, बँकांचे व्यवहार असतील किंवा अगदी दिवाळीमध्ये सोनं खरेदी असो.. सर्व गोष्टी आता ऑनलाईन करता येतात. यामुळेच या सर्व गोष्टींना सुरक्षित ठेवणारा 'पासवर्ड' हा एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे.

तुमचा पासवर्ड जेवढा क्लिष्ट तेवढाच तो सुरक्षित मानला जातो. मात्र, क्लिष्ट पासवर्ड लक्षात ठेवणं हेदेखील एक कष्टाचं काम आहे. असाच विचार करुन कित्येक लोक अगदी साधा पासवर्ड ठेवतात. मात्र यामुळेच हॅकर्स असे पासवर्ड आरामात क्रॅक करू शकतात.

Most Common Password
Smartphone मध्ये सतत Password द्यावा लागतोय? या सेटिंगमुळे काम होईल सोपं

सगळ्यात कॉमन पासवर्ड

2023 सालातील सर्वात कॉमन पासवर्ड हा 123456 होता. बहुतांश लोकांनी ओटीटी अकाउंटसाठी या पासवर्डचा वापर केला असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच 'अ‍ॅडमिन' या शब्दाचा वापरही पासवर्ड म्हणून मोठ्या प्रमाणात केला गेला असल्याचं नॉर्डपासने स्पष्ट केलं. (Tech News)

देशाच्या नावाने पासवर्ड

नॉर्डपासच्या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं आहे, की कित्येक लोक आपल्या देशाच्या नावाने देखील पासवर्ड ठेवतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, भारतातील लोक India@123 असा पासवर्ड ठेवतात; तर अमेरिकेतील लोक USA@123 किंवा US@123 असा पासवर्ड ठेवतात.

Most Common Password
Tech Tips : स्ट्राँग पासवर्ड कसा बनवावा? पेटीएमच्या संस्थापकाने सांगितल्या सोप्या टिप्स; जाणून घ्या

सांख्यिक पासवर्ड

जगातील 31 टक्के पासवर्ड हे सांख्यिक म्हणजेच आकड्यांनी बनलेले आहेत, असंही या अहवालात स्पष्ट झालं आहे. 123456789, 12345, 000000 अशा प्रकारच्या पासवर्डची संख्या सर्वाधिक असल्याचंही नॉर्डपासने सांगितलं. जगातील 70 टक्के पासवर्ड एवढे कमकुवत आहेत की ते एका सेकंदात क्रॅक केले जाऊ शकतात. त्यामुळेच आपला पासवर्ड अधिक क्लिष्ट बनवावा असं आवाहन कंपनीने केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com