Car Sales Record : या कंपन्यांनी मोडला कार विक्रीचा रेकॉर्ड, मार्चमधे केली तगडी कमाई

सुधारित सेमी-कंडक्टर पुरवठ्यामुळे कार विक्री 27 टक्के वाढली, जो एक दशकातील सर्वात वेगवान दर आहे
Car Sales Record
Car Sales Recordesakal

Car Sales Report 2022-23 : मार्च 2023 हा महिना जवळपास सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी फायदेशीर ठरला. सुधारित सेमी-कंडक्टर पुरवठ्यामुळे कार विक्री 27 टक्के वाढली, जो एक दशकातील सर्वात वेगवान दर आहे. या काळात एसयूव्ही कारला सर्वाधिक मागणी होती.

Car Sales Record
Best Cars : भारतातल्या 5 बेस्ट कार, ज्यांनी जिंकलाय लोकांचा विश्वास; वाचा भन्नाट फिचर्स

मारुती सुझुकी

मारुती सुझुकीने 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या सर्वाधिक 19.66 लाख कारची विक्री केली आहे. ज्यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील 17.07 लाख युनिट्स आणि निर्यात म्हणून 2.59 लाख युनिट्सचा समावेश आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीची विक्री 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15.9 टक्के अधिक होती.

मार्च 2023 मध्ये, मारुतीने एकूण 1,70,071 कार विकल्या. तर गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने 1,70,395 मोटारींची विक्री केली होती. विक्रीत थोडीशी घट झाली असली तरी कंपनीने Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 च्या विक्रीत वाढ नोंदवली आहे.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 5,38,640 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, जी त्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. या कालावधीत, नेक्सॉन, पंच, हॅरियर आणि सफारी या कंपनीच्या कारचा एकूण विक्रीत 66 टक्के वाटा होता.

मार्च 2023 मध्ये, कंपनीने एकूण 44,044 युनिट्सची विक्री केली, जी मार्च 2022 मधील 42,293 युनिट्सपेक्षा 4 टक्के जास्त आहे. या कालावधीत, टाटा मोटर्स 6,509 युनिट्सच्या एकूण विक्रीसह ईव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर राहिली.

महिंद्रा अँड महिंद्रा

Mahindra & Mahindra ने मार्च 2023 मध्ये SUV च्या 35,976 युनिट्ससह एकूण 66,091 युनिट्सची विक्री केली, जी कंपनीसाठी आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये 31 टक्के आणि एकूण विक्रीत 21 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 3,59,253 युनिट्सची विक्री केली, जी मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2,25,895 युनिट्सच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com