Moto G72: मोटोरोलाने भारतात लाँच केला दमदार फोन, किंमत 20 हजारांहून कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

moto g72 launched in india with 108mp camera and 5000mah battery

Moto G72: मोटोरोलाने भारतात लाँच केला दमदार फोन, किंमत 20 हजारांहून कमी

Motorola ने भारतात आणखी एक स्मार्टफोन Moto G72 लॉन्च केला आहे. हा ब्रँडचा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्यांना परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्स हवी आहेत अशा लोकांना लक्षात घेऊन डिझाइन केले गेले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz HDR10+ डिस्प्ले, 108-मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5,000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्ज सपोर्ट आणि डॉल्बी अॅटमॉस्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर मिळतात.

मात्र, यामध्ये एक मोठी कमतरता आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा फोन 4G चिपसेटवर काम करतो, म्हणजेच हा मोटोरोला फोन खरेदी करणाऱ्यांना 5G नेटवर्क वापरता येणार नाही.

Moto G72 किंमत किती?

भारतात Moto G72 च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते. पण, नवीन मोटोरोला फोन लॉन्च ऑफर अंतर्गत कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही Moto G72 14,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला निवडक बँक कार्ड्सवर 1,000 रुपयांची सूट मिळते. दुसरीकडे, तुम्ही एक्सचेंज ऑफर वापरल्यास, तुम्हाला 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

हेही वाचा: Affordable 5g Phone: 5G स्मार्टफोन घेताय? स्वदेशी कंपनीचा 'हा' सर्वात स्वस्त फोन आहे बेस्ट ऑप्शन

Moto G72 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Moto G72 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HD+ रिझोल्यूशन, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि हाय-एंड व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी HDR 1+ सर्टिफिकेशनसह 6.6-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. Moto G72 मध्ये एक अतिशय ब्राइट डिस्प्ले आहे, जो इमर्सिव कंटेंट पाहण्याचा अनुभव देईल. Moto G72 मध्ये बर्‍यापैकी हलके डिझाइन आहे, जे एका हाताने फोन वापरणे सोपे करते.

Moto G72 ची बॅटरी

प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर उपलब्ध आहे. याशिवाय, नवीन फोनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते. Moto G72 तुम्हाला दोन रंग पर्यायांमध्ये ऑफर केला जाईल - Meteorite ग्रे आणि पोलर ब्लू. या फोनमध्ये Dolby Atmos च्या सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Navratri: गरबा खेळताना मुलावर काळाचा घाला, धक्क्याने वडीलांनी घेतला अखेरचा श्वास

Moto G72 चा कॅमेरा

फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा मुख्य Samsung HM6 कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे.

टॅग्स :Technology