Motorola घेऊन येतोय 5G फोन; ५०MP कॅमेरा अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motorola

Motorola घेऊन येतोय 5G फोन; ५०MP कॅमेरा अन्...

मोटोरोलाचा (Motorola) नवीन स्मार्टफोन Moto G71 5G ची (5G smartphone)वाट पाहत असलेल्या ग्राहकांसाठी साठी आनंदाची बातमी आहे. हा फोन भारतात १० जानेवारीला फ्लिपकार्टवर लॉँच केला जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. मोटोरोलाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फोनच्या लॉंच तारखेची माहिती दिली आहे. कंपनी या नवीनतम 5G स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन ६९५ प्रोसेसर देणार आहे.

या फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.४ इंचाचा फूल एचडी+ मॅक्स व्हिजन OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले २०:९ च्या गुणोत्तर आणि ६०Hz च्या रीफ्रेश दरासह येतो. कंपनीचा हा फोन ८ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येईल. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट देणार आहे. फोनच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि दोन मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह आठ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल शूटर आहे.

हेही वाचा: आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे, जी ३०W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी फोनमध्ये 5G (5G smartphone), 4G LTE, वाई-फाई, ब्लूटूथ ५, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसबी टाइप-C पोर्ट और ३.५mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देईल.

२५ हजाराच्या जवळपास राहील किंमत

ओएसबद्दल बोलायचे झाले तर Moto G71 5G Android 11 वर आधारित My UX वर काम करेल. फोनची सुरुवातीची किंमत युरोपमध्ये २९९.९९ युरो (सुमारे २५,२०० रुपये) आहे. असे मानले जात आहे की भारतात देखील हा फोन या किमतीच्या जवळपास लाँच केला जाऊ शकतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top