Motorola Edge 50 Discount : डिस्काउंटचा पाऊस! 28 हजारचा मोबाईल मिळतोय 15 हजारात; या बड्या कंपनीने आणली ऑफर, पाहा एका क्लिकवर..

Motorola Edge 50 Smartphone Discount Offer : Motorola Edge 50 स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. ऑफर्ससह हा फोन फक्त 15,000 हजार रुपायांमध्ये मिळतोय.
Motorola Edge 50 Smartphone Flipkart Discount Offer
Motorola Edge 50 Smartphone Flipkart Discount Offeresakal
Updated on

स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मोटोरोलाने आपल्या लोकप्रिय Edge 50 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हा स्मार्टफोन आता फक्त 15,000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे अर्थात काही ऑफर्स आणि एक्सचेंजसह ही किंमत लागू होते.

Motorola Edge 50 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 27,999 होती. मात्र Motorola Edge 60 या नवीन मॉडेलच्या लाँचनंतर, कंपनीने Edge 50 च्या किमतीत मोठी घट केली आहे. सध्या Flipkart वर हा फोन 21,999 मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, विविध बँक ऑफर्स, एक्सचेंज डील्स आणि कॅशबॅकसह याची किंमत आणखी कमी करता येते.

जर तुम्ही सुमारे 6,000 च्या मोबदल्यात जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला, तर नवीन Motorola Edge 50 फक्त 15,000 मध्ये मिळू शकतो. शिवाय, Flipkart 5% कॅशबॅकही देत आहे, त्यामुळे ही संधी गमावू नका

खास फीचर्स

Motorola Edge 50 मध्ये असंख्य प्रीमियम फीचर्स दिले गेले आहेत. यात 6.67 इंचाचा शानदार कर्व्हड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो त्यामुळे गेमिंग आणि व्हिडिओजचा अनुभव अधिकच सुंदर होतो.

या फोनला Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरची ताकद आहे. यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे जी मध्यम ते उच्च दर्जाच्या वापरासाठी पुरेशी आहे.

Motorola Edge 50 Smartphone Flipkart Discount Offer
Google Smartwatch : स्मार्टवॉचमध्ये मिळणार भूकंपाचे अलर्ट; 'या' कंपनीने सुरू केली सुविधा, कसं वापराल हे फीचर? पाहा एका क्लिकवर

कॅमेरा सेटअपदेखील तितकाच प्रभावी आहे

  • 50MP मुख्य कॅमेरा

  • 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा

  • 10MP टेलिफोटो लेंस

  • 32MP सेल्फी कॅमेरा

जबरदस्त बॅटरी आणि चार्जिंग

Motorola Edge 50 मध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली गेली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसह येते. त्यामुळे फोन दिवसभर आरामात चालतो आणि चार्जही लवकर होतो.

Motorola Edge 50 Smartphone Flipkart Discount Offer
Budget Mobile Launch : चीनला धोबीपछाड! भारतातील बड्या कंपनीने 7999 रुपयांत लाँच केला 5G स्मार्टफोन; दमदार फीचर्स एकदा बघाच

आकर्षक डिझाइन आणि कलर ऑप्शन्स

हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असून त्याच्या मागील बाजूस प्रीमियम व्हेगन लेदर फिनिश आहे, जी त्याला एक खास लक्झरी लुक देते. फोन दोन सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहे ग्रीन आणि पिंक.

कुठे खरेदी कराल?

Motorola Edge 50 सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. किंमतीत कपात, कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर अशा सर्व गोष्टींचा लाभ घेऊन, तुम्ही हा स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या आत घेऊ शकता. मात्र एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीनुसार वेगळी असू शकते, याची नोंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com