
Motorola Edge 60 Fusion वर 3000 हजारपर्यंत सूट आणि एक्सचेंज ऑफरसह 15,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
या फोनमध्ये 120Hz pOLED डिस्प्ले, 68W फास्ट चार्जिंग आणि 5,500mAh बॅटरी आहे.
Flipkart GOAT सेलमध्ये 12 जुलै ते 17 जुलैदरम्यान ही ऑफर उपलब्ध आहे.
Motorola Edge 60 Fusion Discount Offer : सध्या फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या 'GOAT सेल' मध्ये ग्राहकांसाठी एक खास संधी उपलब्ध झाली आहे. Motorola ने आपल्या प्रीमियम स्मार्टफोन Edge 60 Fusion वर मोठी सूट जाहीर केली असून, हा दमदार स्मार्टफोन आता अवघ्या ₹15,000 मध्ये खरेदी करता येणार आहे. मूळ किंमतीतून हजारोंची सूट मिळत असल्याने स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
Motorola Edge 60 Fusion दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे –
8GB RAM + 256GB स्टोरेज
12GB RAM + 256GB स्टोरेज
या सेलमध्ये बेस व्हेरियंटची किंमत 25,999 रुपयांवरून 22,999 रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजे थेट 3000 रुपयांची सूट मिळतेय. यासोबतच 5% कॅशबॅक, नो-कॉस्ट EMI, आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत.
जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल आणि तो एक्सचेंजमध्ये 8,000 रुपयांपर्यंतचा रेट मिळवू शकला, तर Edge 60 Fusion तुम्ही फक्त 15,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मात्र, एक्सचेंजमधील अंतिम रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
Motorola Edge 60 Fusion मध्ये प्रीमियम व्हीगन लेदर बॅक पॅनल दिला असून, समोरून 6.67 इंचांचा pOLED 3D कर्व्हड डिस्प्ले आहे.
120Hz रिफ्रेश रेट, 1.5K रिझोल्यूशन,
Smart Water Touch 3.0,
Corning Gorilla Glass 7i संरक्षणासह
हा फोन स्क्रॅच आणि डॅमेजपासून सुरक्षित ठेवतो.
फोनला ताकद देतोय नवीनतम MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर, जो 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडलेला आहे. यामुळे गेमिंगपासून मल्टीटास्किंगपर्यंत सगळं सहज पार पडतं.
फोनमध्ये 5,500mAh क्षमतेची बॅटरी असून, ती 68W Turbo Fast Charging ला सपोर्ट करते. एका चार्जमध्ये सहज दिवसभराचा बॅकअप मिळतो.
मागे 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स
सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा
या कॅमेऱ्यांमुळे फोटो आणि व्हिडीओ दोन्हीमध्ये जबरदस्त स्पष्टता मिळते.
Dolby Atmos ऑडिओ सपोर्ट
IP68 आणि IP69 रेटिंग म्हणजे पाणी आणि धुळीपासून संरक्षण
Android 15 बेस्ड Hello UI
Google Gemini AI सपोर्ट
ही सवलत 12 जुलैपासून 17 जुलैपर्यंत Flipkart GOAT सेल मध्ये लागू आहे. त्यामुळे ज्यांना दमदार स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत खरेदी करायचा आहे, त्यांनी ही संधी नक्कीच गमावू नये.
1: Motorola Edge 60 Fusion सध्या कोणत्या किंमतीत उपलब्ध आहे?
एक्सचेंज ऑफरसह हा फोन केवळ ₹15,000 मध्ये मिळू शकतो.
2: ही सूट कुठे उपलब्ध आहे?
ही ऑफर फक्त Flipkart वरील GOAT सेलमध्येच उपलब्ध आहे.
3: या फोनमध्ये कोणता प्रोसेसर वापरलेला आहे?
या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर आहे.
4: Motorola Edge 60 Fusion चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
50MP + 13MP मागील कॅमेरे आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
5: या फोनमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम दिली आहे?
हा फोन Android 15 आधारित Hello UI वर चालतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.