Moto Tab G62 : भारतात 17 ऑगस्टला होणार लॉन्च, लॉन्चपूर्वीच वाचा फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

motorola moto tab g62 will be launched in india on august 17 with snapdragon 680 processor check details

Moto Tab G62 : भारतात 17 ऑगस्टला होणार लॉन्च, लॉन्चपूर्वीच वाचा फीचर्स

Motorola Moto Tab G62 या मोटोरोला टॅबलेटची बातमी खूप दिवसांपासून चर्चा होत आहे, पण आता कंपनीने त्याच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. कंपनी 17 ऑगस्ट रोजी भारतात Motorola Moto Tab G62 लॉन्च करणार आहे. कंपनी या नवीन टॅबलेटचे 2 मॉडेल सादर करणार आहे. एक 4G मॉडेल आणि दुसरे वायफाय मॉडेल असेल. हा टॅबलेट लॉन्च होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर त्याचे अनेक फीचर्स लिस्ट केले गेले आहेत, चला जाणून घेऊया सविस्तर..

Motorola Moto Tab G62 ची लिस्टेड फीचर्स

कंपनीने या टॅबमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. ग्राहकांना या टॅबच्या 10.6-इंच स्क्रीनला IPS LCD डिस्प्ले मिळेल. यासोबतच टॅबमध्ये 2K रिझोल्यूशन देखील उपलब्ध असेल.OS बद्दल बोलायचे झाले तार Motorola चा हा नवीन टॅब Android 12 सोबत लॉन्च होणार आहे.

Motorola Moto Tab G62 मध्ये 7,700 mAh ची बॅटरी मिळेल. यासोबतच 20W फास्ट चार्जिंग फीचर देखील उपलब्ध असेल. मोटोरोला 4G आणि वाय-फाय नेटवर्कसह 2 भिन्न मॉडेलसह हा नवीन टॅब G62 लॉन्च करेल. तसेच कंपनीने या टॅबचे मेटॅलिक डिझाइन तयार केले आहे. तसेच हे मॉडेल हे स्लीम असणार आहे. इतर फीचर्स- डॉल्बी अॅटमॉसचे क्वाड स्पीकर ऑडिओ फीचर देखील या टॅबमध्ये देण्यात आले आहे.

Motorola ने अजून Tab G62 च्या रॅम आणि इंटरनल स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, या टॅबमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. त्याचप्रमाणे कंपनीने टॅबच्या कॅमेऱ्यावर काहीही खुलासा केलेला नाही. पण रिपोर्टनुसार, या टॅबमध्ये 8 MP मेन बॅक कॅमेरा आणि 5 MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. Motorola Moto Tab G62 लॉन्च केल्यानंतर, तो लवकरच फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध होईल.

टॅग्स :Technology