Motorola Razr 50 Ultra मोबाईल झाला एकदम स्वस्त! मिळतोय चक्क 35 हजारांचा बंपर डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर..

Motorola Razr 50 Ultra discount offer : मोटोरोलाचा Razr 50 Ultra फोल्डेबल स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर तब्बल ३५ हजार सवलतीसह उपलब्ध आहे.
Motorola Razr 50 Ultra smartphone discount offer
Motorola Razr 50 Ultra smartphone discount offeresakal
Updated on

Razr 50 Ultra Flipkart Discount : मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. Motorola कंपनीचा हायएंड फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr 50 Ultra सध्या फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तब्बल 35,000 रुपायांची सवलत मिळाल्यामुळे, हा स्मार्टफोन खरेदीसाठी उत्तम संधी ठरत आहे.

एवढी आहे नवीन किंमत

Motorola Razr 50 Ultra ची मूळ किंमत 99,999 रुपये आहे. मात्र सध्या Flipkart वर फक्त 68,490 रुपयेला उपलब्ध आहे. इतकेच नाही, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास आणखी 4,000 रुपयेची अतिरिक्त सूट मिळते. त्यामुळे या डिव्हाईसची अंतिम किंमत 64,490 रुपयेपेक्षा कमी होते.

ही सवलत केवळ 12GB RAM आणि 512GB स्टोरेज असलेल्या Peach Fuzz या खास रंगातील व्हेरिएंटसाठीच लागू आहे.

Motorola Razr 50 Ultra smartphone discount offer
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली आणखी एका नव्या फीचरची एन्ट्री; पाहा एका क्लिकवर..

प्रीमियम डिस्प्ले अनुभव:

Motorola Razr 50 Ultra मध्ये 4-इंचांचा LTPO AMOLED कव्हर डिस्प्ले आहे, ज्याला HDR10+ सपोर्ट आणि 165Hz रिफ्रेश रेट आहे. हा डिस्प्ले 10 बिट कलर आणि 2400 निट्स पीक ब्राईटनेस साठी ओळखला जातो. या स्क्रीनला Gorilla Glass Victus चे संरक्षण मिळाले आहे.

मोबाईल उघडल्यानंतर तुम्हाला एक 6.9-इंचाचा फुल AMOLED फोल्डेबल डिस्प्ले मिळतो, जो तितकाच ब्राइट आणि स्मूद आहे. दोन्ही स्क्रीनवर प्रमुख अॅप्स सहज चालतात, त्यामुळे मल्टीटास्किंगचा अनुभव बेस्ट होतो.

Motorola Razr 50 Ultra smartphone discount offer
iPhone Resale : अ‍ॅपल कंपनीची सुवर्णसंधी! 'या' 5 जुन्या मॉडेलचे आयफोन तुम्हाला बनवू शकतात लखपती, रिसेल किंमत झाली डबल

पॉवरफुल हार्डवेअर आणि कॅमेरा

  • प्रोसेसर: Snapdragon 8s Gen 3 चिपसेट

  • कॅमेरा सेटअप

    • मागील बाजूस 50MP प्राइमरी सेन्सर आणि 50MP टेलीफोटो लेन्स, G 2x ऑप्टिकल झूम देते.

    • सेल्फींसाठी बाह्य किंवा मुख्य डिस्प्लेचा वापर करता येतो, त्यामुळे कोणत्याही अँगलमधून फोटो उत्कृष्ट येतात.

बॅटरी आणि चार्जिंग

या स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी असून, ती 45W फास्ट वायर्ड चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग ला सपोर्ट करते.

Motorola Razr 50 Ultra smartphone discount offer
Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला तुस्सी ग्रेट हो! Ax-4 मिशनचा भारताच्या ‘गगनयान’साठी फायदा, पाहा व्हिडिओतून काय म्हणाले अंतराळवीर..

कसा खरेदी कराल?

Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जाऊन Motorola Razr 50 Ultra (Peach Fuzz, 12GB+512GB) साठी ही सवलत मिळवू शकता. बँकेचे ऑफर्स तपासून योग्य ते कार्ड वापरल्यास, हा प्रीमियम फोल्डेबल फोन अवघ्या 64,490 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

जर तुम्ही एक प्रीमियम, फोल्डेबल आणि भविष्यकालीन स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर Motorola Razr 50 Ultra वरची ही ऑफर चुकवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com