Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली आणखी एका नव्या फीचरची एन्ट्री; पाहा एका क्लिकवर..

Whatsapp AI Summarize Feature : व्हॉट्सअ‍ॅपने 'AI Summarize' हे नवीन फीचर लॉंच केलं असून, आता कोणताही न वाचलेला महत्त्वाचा मेसेज लक्षात राहणार नाही.
Whatsapp AI Summarize Feature
Whatsapp AI Summarize Featureesakal
Updated on

Whatsapp AI Feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक अत्याधुनिक आणि उपयोगी फीचर आणलं आहे, ज्यामुळे एकही महत्त्वाचा मेसेज वाचल्यावाचून राहणार नाही. ‘AI Summarize’ असं या नव्या फीचरचं नाव असून हे तंत्रज्ञान मेटाच्या एआयवर आधारित आहे. सुरुवातीला हे फीचर अमेरिका आणि काही निवडक देशांमध्ये सुरू करण्यात आलं असून लवकरच ते इतर देशांमध्येही विस्तारण्याची शक्यता आहे.

AI Summarize नेमकं काय करतं?


हे फीचर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्व न वाचलेले मेसेज वैयक्तिक आणि ग्रुप दोन्ही एका छोट्या सारांश रूपात दाखवतं. यामुळे युजरला प्रत्येक मेसेज उघडून वाचण्याची गरज नाही तरीही सगळी महत्त्वाची माहिती कळते. या सारांशात संपूर्ण संदेशाची गोळाबेरीज केली जाते आणि युजरला पटकन कळू शकतं की कुठल्या मेसेजला प्राधान्य द्यायचं आहे.


या फीचरमागे ‘Private Processing’ नावाचं एक खास तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे, जे Trusted Execution Environment (TEE) च्या आधारावर काम करतं. या तंत्रज्ञानामुळे युजरचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि हा सारांश देखील फक्त संबंधित युजरलाच दिसतो. कोणत्याही इतर व्यक्तीला किंवा मेटाला हे मेसेज्स वाचता येत नाहीत, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

Whatsapp AI Summarize Feature
Moto G96 Launch : एकच झलक, सबसे अलग! लॉन्च होतोय Moto G96 स्मार्टफोन; परडवणारी किंमत अन् दमदार फीचर्स, पाहा एका क्लिकवर..

उत्तरांची सजेशन्सही मिळणार


या एआयच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना काही मेसेजेससाठी उत्तरांचं सुचवलेलं स्वरूप देखील मिळेल. विशेष म्हणजे हे सजेशन मिळवण्यासाठी मेसेज उघडण्याची गरजही भासत नाही. हे यंत्रणा विशेषतः व्यस्त युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, जे अनेकदा महत्त्वाचे मेसेज चुकवतात.

Whatsapp AI Summarize Feature
ChatGPT वापरामुळे विचार करण्याच्या कौशल्याला धोका? मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम; MIT च्या संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

सध्या इंग्रजीतच उपलब्ध


सुरुवातीला ही सेवा केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे आणि अमेरिका या देशात ती रोलआउट झाली आहे. मात्र मेटा लवकरच इतर भाषांमध्ये आणि देशांमध्येही हे फीचर देण्याच्या तयारीत आहे.

जगभरातील ६० कोटींपेक्षा अधिक भारतीय युजर्स असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपसाठी हे फीचर एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप केवळ एक संवादाचं माध्यम न राहता स्मार्ट डिजिटल सहाय्यकाच्या रूपात पुढे येत आहे. तर आता व्हॉट्सअ‍ॅपवर कुठलाही महत्त्वाचा मेसेज तुमच्या लक्षात न येण्याची शक्यता नाही एआयची साथ तुमच्यासोबत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com