Mukesh Ambani News: लॅपटॉप बाजारात 'जिओ' धुमाकूळ घालणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani News

Mukesh Ambani News: लॅपटॉप बाजारात 'जिओ' धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली ः काही वर्षांपूर्वी 'जिओ' लाँच करुन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेले मुकेश अंबानी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांची रिलायन्स जिओ ही कंपनी स्वस्तातला लॅपटॉप बाजारात आणणार आहे.

हेही वाचा: Pune CNG Rate: CNGच्या दरात वाढ; प्रतीकिलो 91 रूपये मोजावे लागणार

अंबानींच्या या लॅपटॉपची किंमत केवळ 184 डॉलर असणार असणार आहे. भारतीय रुपयांमध्ये साधारण 15 हजार रुपयांमध्ये हा लॅपटॉप खरेदी करता येईल. या लॅपटॉपचं नाव जिओ बुक ठेवण्यात आलेलं आहे. यापूर्वी कंपनीने स्वस्तातला जिओ फोन बाजारात आणला होता. जिओ फोनच्या यशानंतर आता लॅपटॉप बाजार हे कंपनीचे लक्ष्य आहे.

सध्या मार्केटमध्ये एचपी, डेल आणि लिनोओ या कंपन्यांचा दबदबा आहे. रियायन्सच्या लॅपटॉप बाजारातील एन्ट्रीने किंमतीत आणि सुविधांमध्ये चुरस निर्माण होईल, हे नक्की. विशेष म्हणजे या लॅपटॉपमध्ये 4जी सीम चालणार आहे. त्यासाठी रिलायन्सने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीसोबत करार केलाय.

हेही वाचा: Bigg Boss 16 : घरात चालणार बिग बॉसची गुंडगिरी! एकापाठोपाठ नवीन नियम

'क्वालकॉम'कडून यासाठी चिप टेक्नॉलॉजी मिळणार असून मायक्रोसॉफ्ट काही अॅप्ससाठी सपोर्ट करणार आहे. सध्या जिओकडे ४२ कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. टेलिकॉम क्षेत्रातली ही सर्वात मोठी कंपनी आहे. यासंदर्भात कंपनीने माहिती दिली नसली तरी रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.