

Mumbai police investigating documents related to the ₹16.34 lakh romance scam where fraudsters impersonated Elon Musk and tricked a woman into buying Amazon gift cards for a fake US visa.
esakal
आजच्या डिजिटल जगात सोशल मीडियावरून प्रेम फुलणे आणि मग फसवणूक होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण मुंबईच्या चेंबूर भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय गृहिणीची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क असल्याचा दावा करणाऱ्या एका फसव्या व्यक्तीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आणि अमेरिकेत नवे जीवन देण्याचे आश्वासन देऊन तिच्याकडून १६.३४ लाख रुपये उकळले. ही घटना ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या धोक्याची जिवंत उदाहरण आहे.