MX प्लेअर वापरताय? ही बातमी आहे महत्त्वाची!

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

- नवीन 'डेटा सेव्हर मोड'
- कोरोना व्हायरसमुळे एमएक्स प्लेअरने हे फिचर केलं लाँच. 

मुंबई : संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरसची दहशत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्वचजण आपापल्या घरात बसून आहेत. स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी लोक इंटरनेटचा वापर करतात आणि सोशल मीडियाचा वापर करतात. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ची परवानगी दिली. यातच नेटचा वापर दुपटीने वाढला. बहुतांश युजर व्हिडिओ पाहण्यासाठी जवळपास ११ जीबी इंटरनेटचा वापर करत आहे. यामुळं एमएक्स प्लेअरवर व्हिडिओ पाहताना कमीत कमी इंटरनेटचा वापर व्हावा, यासाठी एक पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. 

काय आहे एमएक्स प्लेअरमध्ये?

एमएक्स प्लेअरद्वारे प्रत्येक युजर १० भाषांमधील प्रीमिअम कन्टेन्ट डाउनलोड करू शकतो. खासकरून एमएक्स ओरिजिनल सीरिज पण खूप प्रसिद्ध आहे. ज्यात ड्रामा, विनोद आणि रोमान्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य पाहायला मिळते. हे ऍप ऍण्ड्रॉइड, आयओएस, वेब, अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक, अॅण्ड्रॉइड टीव्ही आणि वनप्लस टीव्हीमध्ये उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mx player switches on data saver mode