तुम्ही विकत घेतलेला फोन चोरीचा तर नाही ना? या सोप्या पद्धतीने करा खात्री

Nagpur Mobile Phone news Check if your phone is stolen
Nagpur Mobile Phone news Check if your phone is stolen

नागपूर : मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात दिसून येतो. कधीकाळी मोबाईल घ्यायचा म्हटलं तर बराच विचार करावा लागत होता. आता मात्र तसे काहीही राहिलेले नाही. आता तर ही स्थिती आहे की एका व्यक्तीकडे दोन ते तीन मोबाइल आहेत. यावरूनच मोबाइलची काय स्थिती आहे हे लक्षात येईल. तसेही भारतीय बाजारपेठ जगातील आघाडीच्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक आहे. यामुळे बनावट फोन बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेले आहेत.

I phone सारखे अनेक महागडे फोन बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. मात्र, अशे महागडे फोन खरेदी करण्याची प्रत्येकाची परिस्थिती नसते. यामुळे सेकंड हॅन्ड फोनला बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच अनेकांना तीस ते चाळीस हजारांच्या घरात महागडा फोन खरेदी करावयाचा असतो. मात्र, पैशांअभावी ते शक्य नसते. यामुळे सेकंड हॅन्ड मोबाइल खरेदीकडे त्यांचा कल असतो.

ग्राहकांची हीच स्थिती लक्षात घेऊन चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. बाजारात, गर्दीच्या ठिकाणी महागडे मोबाइल चोरून विक्री करणारी टोळी बाजारात आहे. मात्र, ग्राहकांना याची कल्पना नसल्याने आपण विकत घेत असलेला सेकंड हॅन्ड फोन चोरीचा आहे की नाही याची त्यांना कल्पना नसते. यामुळे त्यांची फसवणूक होते. आम्ही तुम्हाला तुम्ही विकत घेतलेला फोन वास्तविक आहे की बनावट हे ओळखण्याचा मार्ग सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया...

पहिली पद्धत

तुम्ही विकत घेतलेला फोन चोरीचा आहे की हे माहिती करायचे असेल तर दूरसंचार विभागाच्या वेबसाइट https://ceir.gov.in/Divice/CeirIMEIVerifications.jsp वर जाऊन शोधू शकता. येथे तुम्हाला मोबाइल नंबर, ओटीपी आणि आयएमईआय नंबर प्रविष्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनशी संबंधित सर्व माहिती सहज उपलब्ध होईल.

दुसरी पद्धत

तसेच एसएमएसद्वारासुद्धा हे तपासू शकता. यासाठी मोबाईलमध्ये केवायएम टाइप करून स्पेस द्या आणि १५ अंकी आयएमईआय नंबर टाईप करा. नंतर हा मेसेज १४४२२ या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाइलवर एक मेसेज येईल. यात फोन आणि कंपनीशी संबंधित सर्व माहिती असेल. मेसेज आणि वेबसाइटमध्ये ‘आयएमईआय आयएस व्हॅलिड’ अस लिहिले असेल तर तुमचा फोन चोरीचा नाही असे समजा.

तिसरी पद्धत

KYM - Know Your Mobile या ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही तपासू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमच्या फोनशी संबंधित सर्व माहिती मिळेल. या माहितीमध्ये तुमच्या मोबाइलचा आयएमईआय नंबर न दाखवता ब्लॉक असे लिहून येत असेल तर फोन चोरीचा आहे असे समजा.

संपादन आणि संकलन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com