esakal | भारताच्या मंगळयानाला चीनची टक्कर; टियानवेन-1' नावाच्या मोहिमा करणार लॉंच
sakal

बोलून बातमी शोधा

NASA China and the UAE launch new spacecraft this month

आपल्या पहिल्या अपयशी मंगळ मोहिमेनंतर चीनने आता "टियानवेन-1' नावाच्या मोहिमा लॉंच करत आहे. त्याचबरोबर नासा आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचे अवकाशयानही जुलै 2020च्या शेवटी मंगळाकडे झेपावणार आहे. 

भारताच्या मंगळयानाला चीनची टक्कर; टियानवेन-1' नावाच्या मोहिमा करणार लॉंच

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे : भारतीयांच्या जन्मपत्रिकेत ठाण मांडून बसलेल्या मंगळाला पहिल्याच प्रयत्नात गवसणी घालणाऱ्या भारताच्या "मंगळयान-1' मोहिमेचे जगभरात कौतुक झाले. मात्र शेजाऱ्यांना हे यश पचवता आले का नाही, हा मोठा प्रश्‍नच आहे. आपल्या पहिल्या अपयशी मंगळ मोहिमेनंतर चीनने आता "टियानवेन-1' नावाच्या मोहिमा लॉंच करत आहे. त्याचबरोबर नासा आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचे अवकाशयानही जुलै 2020च्या शेवटी मंगळाकडे झेपावणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 ला अवकाशात झेपावले होते. त्याच्या काही वर्ष आधीच म्हणजेच 8 नोव्हेंबर 2011 ला चीनची पहिली मंगळ मोहीम "इंगूहो-1' (Yinghuo-1) अपयशी ठरली होती. त्यामुळे भारताच्या या यशाने चीनसह अनेक देशांना आश्‍चर्य वाटले. भारत आता मंगळयान-2 च्या तयारीत असतानाचा चीनने "टियानवेन-1' या मंगळ मोहिमेच्या उड्डाणाची घोषणा केली आहे. या तीनही देशांच्या मोहिमांमुळे मंगळावर "रोव्हर'ची संख्या आता वाढणार आहे. प्रामुख्याने मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणे आणि त्याचा भौगोलिक नकाशा प्राप्त करणे हा या मोहिमांचे भाग आहे. 
--------------
सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर
--------------
अनेक देशांची चुकीच्या मार्गाने वाटचाल; जागतिक आरोग्य संघटना
--------------
चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांची ही पहिलीच मंगळ मोहीम असणार आहे. अर्थात सर्वच नियोजित पद्धतीने घडले तर. जुलै महिन्याच्या शेवटी हे अवकाशयान उड्डाण करतील असा अंदाज आहे. कारण मंगळाजवळ पोचण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. कारण इतर वेळेच्या तुलनेत तो या कालावधीत पृथ्वीच्या जवळून जणार आहे. हे लॉंच जर अपयशी ठरले तर सगळ्यांनाच 2022 पर्यंत वाट पहावी लागेल. 

- मंगळावरील जिवाश्‍मांचे नासा करणार संकलन
नासाची ही मंगळ मोहीम जास्त ऍडव्हान्स असणार आहे. मंगळावरील जीवाश्‍मांचे संकलन आणि पहिली टेस्ट हेलिकॉप्टर उडविण्याचा घाट शास्त्रज्ञांनी घातला आहे. दोनदा पुढे ढकलली लॉंच डेट आता 30 जुलैला सेट करण्यात आली आहे. काही कारणाने गडबड झाली तर 15 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी नासाच्या वैज्ञानिकांना मिळणार आहे. त्यानंतर लॉंच विंडो उपलब्ध नसेल. सर्व काही सुरळीत झाले तर 18 फेब्रुवारी 2021 ला नासाचे अवकाशयान मंगळाच्या जेझेरो खड्ड्यात (क्रियेटर) उतरेल. तो सर्वात प्राचीन खड्डा असून त्यात जीवाश्‍म असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. इथली माती, खडक आदी महत्त्वपूर्ण घटकांचे संकलन हा रोव्हर करणार आहे. जेणेकरून भविष्यातील मोहिमांमध्ये तो सगळा संग्रह पृथ्वीवर आणता येईल. या मोहिमेसाठी 3 अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. 

नाकाच्या यानाचे लॅंडींग व्यवस्थित झाले तर त्यातून हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्यात येणार आहे. दुसऱ्या ग्रहावर उडालेले हे पहिले हेलिकॉप्टर असेल. मंगळावर पहिल्यांदा नेव्हीगेशन सिस्टिमचा वापर होईल. कार्बन डायऑक्‍साईडपासून ऑक्‍सिजन बनविण्यात येईल. मंगळावरील वातावरणाचा अभ्यासही याद्वारे करण्यात येईल. 

- चीनचे "टियानवेन-1'
भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेसारखीच ही मोहीम आहे. यामध्ये एक ऑर्बायटर मंगळाच्या कक्षेत फिरेल आणि एक रोव्हर जमिनीवर लॅंड करेल. ही मोहिम यशस्वी झाल्यास चीनची ही पहिली मंगळ मोहीम असेल. रोव्हर वरील रडार मंगळाच्या जमिनीखाली असलेले पाण्याचे साठे असल्यास ते शोधणार आहे. 2030 मध्ये चीन ते सॅंपल पृथ्वीवर आणण्यासाठी मोहीम आखणार आहे. अजूनही चीनने अधिकृतपणे मोहिमेची तारीख घोषित केली नसली तरी जुलैच्या अखेर हे लॉंच होण्याची शक्‍यता आहे. 

- संयुक्त अरब अमिरातची पहिली मंगळ मोहीम
जपानच्या तळावरून संयुक्त अरब अमिरातच्या पहिल्या मंगळ मोहिमेचे उड्डाण होणार आहे. मंगळाभोवती फिरून त्यांच्या वातावरणाचा अभ्यास हे अवकाशयान करणार आहे.

loading image