गुरूच्या चंद्रावर 'नासा' जीवन शोधणार

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन : गुरूचा चंद्र असलेल्या युरोपावर नासा रोबोटिक लॅंडर पाठविण्याची योजना आखत आहे. युरोपा हा पूर्णपणे बर्फाच्छादित असून, येथे जीवन शोधण्याचा नासाचा प्रयत्न असणार आहे.

वॉशिंग्टन : गुरूचा चंद्र असलेल्या युरोपावर नासा रोबोटिक लॅंडर पाठविण्याची योजना आखत आहे. युरोपा हा पूर्णपणे बर्फाच्छादित असून, येथे जीवन शोधण्याचा नासाचा प्रयत्न असणार आहे.

नासाची "प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजन' ही संस्था 2016 मध्ये युरोपावरील लॅण्डर मोहिमेच्या वैज्ञानिक मूल्यांचे आणि अभियांत्रिकी रचनेची भविष्यातील मूल्यमापन करत होती. नासातर्फे वेळोवेळी अभ्यास केला जातो, या संस्थेच्या अहवालांना विचारात घेऊनच कोणतीही मोहीम आखली जाते.

या मोहिमेसाठी संस्थेकडून आलेल्या अहवालातून नासाने तीन वैज्ञानिक ध्येय ठरवली आहेत त्यामध्ये युरोपावर जीवन शोधणे याला मात्र प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर तेथील वातावरण आणि पृष्ठभागाची रचना व स्थिती याचाही अभ्यास केला जाणार आहे. तसेच पृष्ठभागाच्या स्थितीनुसार पुढील मोहिमेसाठी लागणाऱ्या नोंदी आणि येथील गोठलेल्या जमिनीखालील समुद्राचाही अभ्यास केला जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नासाने येथील दुर्मिळ परिस्थितीचा विचार करता युरोपा हा सद्यःस्थितीला पृथ्वी सोडून जीवन शोधण्यासाठी युरोपाला सर्वोच्च प्राधान्य असेल असे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nasa to discover life on jupiter's moon