पृथ्वीवर ओढवलंय मोठं संकट! सूर्याला पडलं पृथ्वीच्या वीसपट मोठं भगदाड | Massive 'Hole' Spotted on Sun's Surface | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Massive 'Hole' Spotted on Sun's Surface

पृथ्वीवर ओढवलंय मोठं संकट! सूर्याला पडलं पृथ्वीच्या वीसपट मोठं भगदाड

'Hole' Spotted on Sun's Surface : सौरमंडळात दररोज काही ना काही घडत असतं ज्याचा थेट परीणाम आपल्याला ग्रहांवर दिसून येतो. अनेकदा पृथ्वीवरही त्याचे पडसाद उमटतात. अलीकडेच, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यामध्ये मोठं भगदाड पडलयं जे भगदाड पृथ्वीच्या वीस पटीने मोठं आहे. यामुळे पृथ्वीवर काय परिणाम होते.

आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (NASA have spotted a massive Hole Spotted on Suns Surface which is 20 times larger than Earth )

सूर्याला पृथ्वीच्या २० पट मोठं छिद्र पडलंय. या छिद्राध्ये जवळपास पृथ्वीसारखे 20 ग्रह येणार इतकं मोठं हे छिद्र आहे. या छिद्राला कोरोनल होल म्हटले जातं. या कोरोनल होलमुळे पृथ्वीला काही धोका आहे का? असे प्रश्न निर्माण झाले.

या छिद्रातून अतिशय वेगाने धोकादायक वादळासारखे वारे बाहेर पडतात. हे वारे पृथ्वीवर धोका निर्माण करू शकतात. याचा परिणाम पृथ्वीवर दिसून येणार. एवढंच काय तर पृथ्वीच्या अनेक भागात वीज सुद्धा खंडित होण्याची शक्यता आहे.

याआधीही पृथ्वीवर असंच होल दिसून आलं होतं. ते होल पृथ्वीपेक्षा ३० पट मोठं होतं. त्यामुळे अमेरिकेच्या अॅरिझोना येथे रात्री आकाशात जांभळे आणि हिरवे दिवे दिसले होते. आता या होलमुळेही पृथ्वीवर परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जातेय.