National Consumer Rights day 2022: ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झालीये? 'या' क्रमांकावर करा तक्रार

दरवर्षी 24 डिसेंबर भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन पाळला जातो. यानिमित्ताने ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृक करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
Online Shopping
Online ShoppingSakal

Online Shopping Fraud Complaint: सध्या ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. घरबसल्या स्मार्टफोनच्या एका क्लिकवर कोणतीही वस्तू सहज मागवता येते. अगदी कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत कोणतीही वस्तू ऑनलाइन मागवणे शक्य आहे. ऑनलाइन शॉपिंगचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन शॉपिंग करताना बंपर डिस्काउंटचा फायदा मिळतो. मात्र, बंपर डिस्काउंटच्या नादात फसवणूक देखील होते.

अनेकदा ऑर्डर केलेली वस्तू वेगळी असते व आलेली वस्तू दुसरी असते. आयफोनऐवजी साबण आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑनलाइन शॉपिंग करताना तुमच्यासोबतही फसवणूक झाल्यास घाबरू नका. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर सपोर्टशी संपर्क साधू शकता. येथेही समस्येचे निवारण न झाल्यास थेट राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनशी संपर्क करू शकता. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने (National Consumer Rights day 2022) ऑनलाइन फसवणूक झाल्यास कोठे तक्रार करू शकता, याविषयी जाणून घेऊया.

Online Shopping
National Consumer Rights day 2022 : भारतीय संविधानाने प्रत्येक ग्राहकाला दिलेत हे महत्त्वाचे हक्क!

सहज करू शकता तक्रार

ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झाल्यास नॅशनल कंझ्यूमर हेल्पलाइन नंबर १८००-११-४००० अथवा १४४०४ वर तक्रार करू शकता. तुम्ही सकाळी ९:३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या क्रमांकावर कॉल करू शकता. तसेच, https://consumerhelpline.gov.in/user/signup.php या साइटवर जाऊन देखील तक्रार करता येईल.

ऑनलाइन करता येईल तक्रार

ऑनलाइन तक्रार करण्यासाठी तुम्हाला https://consumerhelpline.gov.in/user/signup.php साइटवर जावे लागेल. साइटवर गेल्यावर सर्वातआधी लॉग इन करावे लागेल. पुढे सर्व आवश्यक माहितीसह तक्रारीचा फॉर्म भरा. त्यानंतर तुमच्या तक्रारीवर कारवाई होईल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सुरक्षेसाठी फॉलो करा या टिप्स

ऑनलाइन शॉपिंग करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन सारख्या वेबसाइट्सवरूनच वस्तू खरेदी करावी. अनेकदा डिस्काउंटच्या नादात आपण कोणत्याही वेबसाइटवरून वस्तू खरेदी करतो व यामुळे नुकसान होते. शॉपिंग करताना वस्तूचे रिव्ह्यू नक्की वाचा व त्यानंतरच खरेदी करा.

Online Shopping
OTT App: Netflix-Hotstar साठी पैसे खर्च करण्याची गरजच नाही, 'या' अ‍ॅपवर मोफत पाहू शकता चित्रपट-सीरिज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com