National Science Day 2021 : किल्ले अजिंक्यता-यावरुन रेडिओ संदेशांची होणार देवाण-घेवाण

National Science Day 2021 : किल्ले अजिंक्यता-यावरुन रेडिओ संदेशांची होणार देवाण-घेवाण

सातारा : सातारा इन्स्टिटयूट ऑफ हॅम आणि प्रसार भारती केंद्र सातारा यांच्या मदतीने साताऱ्यातील हौशी हॅम रेडिओधारकांतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस रविवारी (ता. २८)  कोविडच्या संदर्भात सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पळून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. हौशी हॅम रेडिओ परवानाधारक शहरातील सर्वात उंच अशा अजिंक्यतारा किल्ल्यावरून रेडिओ संदेशाची देवाणघेवाण करणार आहेत अशी माहिती संयोजक कोमल भोसले यांनी दिली.

सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला सर्वात उंच ठिकाण आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४३०० फूट उंचावर आहे. अजिंक्यतारा किल्यावरील प्रसारभारती केंद्रामध्ये होणाऱ्या या उपक्रमात सातारा इन्स्टिटयूट ऑफ हॅम येथील हौशी हॅम रेडिओ परवानाधारक सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अँटेना उभारून सर्व प्रकारचे रेडिओ संदेशवहनाचे प्रयोगही हॅम मंडळी करणार आहेत. 

हा उपक्रम शनिवारी  (ता. २७) सायंकाळी ठीक पाच वाजता सुरू होईल. त्यानंतर अखंडपणे २४ तास सुरू राहील. या उपक्रमाची सांगता रविवारी दुपारी होईल. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतातील वेगवेगळ्या भागातून अशी सुमारे ४१ केंद्रे कार्यरत असणार आहेत असे भाेसले यांनी नमूद केले. 

रविवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता होणाऱ्या अनौपचारिक सभेत प्रसारभारती सातारा आकाशवाणी केंद्राच्या सहायक निदेशक अभियांत्रिकी व केंद्रप्रमुख श्रीमती संध्या रत्नपारखी हॅम धारकांना मार्गदर्शन करतील. साताऱ्याचे हॅम रोहित भोसले आपले रेडिओ संदेशवहनाबाबत अनुभव कथन करतील. विद्यार्थाना Youtube च्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल असेही  कोमल भोसले यांनी सांगितले.

हॅम रेडिओ म्हणजे काय?

एकमेकांशी संपर्क ठेवू शकणारी बिनतारी (वायरलेस) संपर्क यंत्रणा म्हणजे हॅम रेडिओ. हा एखाद्या जुन्या टेलिफोन किंवा वॉकीटॉकीसारखा वाटतो. शक्‍यतो सर्व लॅंडलाइन टेलिफोन हे एकमेकांना तारांद्वारे जोडलेले असतात; पण हॅम यंत्रणा मात्र पूर्णपणे रेडिओ लहरींवर (इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक वेव्हज) चालते. या हॅम रेडिओजना एक ॲन्टेना जोडलली असते व या ॲन्टेनाद्वारे हॅम रेडिओ हे वायरलेस रेडिओ सिग्नल पाठवू किंवा स्वीकारू शकतात. म्हणूनच हॅम यंत्रणा ही इतर कुठल्याही मोबाईल टॉवर किंवा टेलिफोन वायर्सवर अवलंबून नसते व म्हणूनच या दोन्ही गोष्टी बंद पडल्यावरसुद्धा विनासायास चालू राहते.

गोंदवल्यात जाणार आहात? थांबा! महत्वपुर्ण निर्णय वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com