Google Chrome Update : हातातील कामं सोडा अन् तातडीने करा 'गुगल क्रोम' अपडेट! सरकारचा गंभीर इशारा

NCRT-In Alert : कम्प्युटर किंवा मोबाईलवर सायबर हल्ला झाल्यास यूजर्सची गोपनीय माहिती, गुगलवर सेव्ह असणारा डेटा, कम्प्युटरमधील डेटा, सेव्ह असणारे पासवर्ड अशा कित्येक गोष्टी हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता असते.
Google Chrome Update
Google Chrome UpdateeSakal

Google Chrome Alert : भारत सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) गुगल क्रोम यूजर्सना गंभीर इशारा दिला आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यामुळे तातडीने हा ब्राऊजर अपडेट करून घेण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.

काय आहे धोका?

प्रत्येक ब्राऊजरमध्ये सायबर सुरक्षेसाठी काही प्रमाणात अँटी-व्हायरस फायरवॉल दिलेली असते. मात्र, हॅकर्स नवनवीन पद्धतीने ही वॉल भेदण्याचा प्रयत्न करत असतात. सॉफ्टवेअर जुनं झाल्यास ते नवीन प्रकारच्या व्हायरसना अडवण्यास सक्षम ठरत नाही. अशाच प्रकारचा धोका जुन्या क्रोम ब्राऊजवर असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

Google Chrome Update
Apple Conned : सिक्युरिटी रिसर्चरने अ‍ॅपलला असं गंडवलं, की कंपनीलाही समजलं नाही! उलट त्याच्याच कामाचं केलं कौतुक...

कम्प्युटर किंवा मोबाईलवर सायबर हल्ला झाल्यास यूजर्सची गोपनीय माहिती, गुगलवर सेव्ह असणारा डेटा, कम्प्युटरमधील डेटा, सेव्ह असणारे पासवर्ड अशा कित्येक गोष्टी हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या मोबाईल आणि ब्राऊजरचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं असतं.

असं करा अपडेट

  • सगळ्यात आधी गुगल क्रोम उघडा.

  • विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन उभ्या डॉट्सवर क्लिक करा.

  • यानंतर हेल्प पर्यावर क्लिक करून, गुगल क्रोम सिलेक्ट करा.

  • याठिकाणी जर अपडेट उपलब्ध असेल, तर त्वरीत ब्राऊजर अपडेट करा.

  • यानंतर आपोआप तुमचं ब्राऊजर अपडेट होईल.

Google Chrome Update
Internet Safety Tips : इंटरनेटवर कसं रहायचं सुरक्षित? या सोप्या टिप्स ठरतील लाखमोलाच्या..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com