Internet Safety Tips : इंटरनेटवर कसं रहायचं सुरक्षित? या सोप्या टिप्स ठरतील लाखमोलाच्या..

Online Safety : इंटरनेटवरील सुरक्षेसाठी फेब्रुवारीतील दुसरा मंगळवार हा इंटरनेट सेफ्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सायबर सुरक्षेबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Internet Safety Tips
Internet Safety TipseSakal

Internet Safety Day 2024 : आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातं. सध्याच्या जगात जेवढा इंटरनेटचा वापर वाढला आहे, तेवढेच इंटरनेटवरील धोकेही वाढले आहेत. यामुळेच इंटरनेटवरील सुरक्षेसाठी फेब्रुवारीतील दुसरा मंगळवार हा इंटरनेट सेफ्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सायबर सुरक्षेबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. इंटरनेट कनेक्शन

ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी तुमचं इंटरनेट कनेक्शन सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणारं वायफाय वापरताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी इंटरनेट सर्फिंगसाठी व्हीपीएनची मदत घेणं फायद्याचं ठरू शकतं.

2. पासवर्ड

आजकाल तुमची बँकिंगपासून खासगी माहिती देखील ऑनलाईन उपलब्ध असते. त्यामुळे पासवर्ड हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाला आहे. आपला पासवर्ड सेट करताना तो अगदीच सोपा असू नये याची खबरदारी घ्या. यासाठी तुम्ही इंटरनेटवर सर्वात कमकुवत पासवर्ड्सची यादी तपासू शकता. तुमचा पासवर्ड या यादीमध्ये असेल, तर तो त्वरीत बदलून घ्या.

Internet Safety Tips
Types of Deepfake : एकच नाही, तर डीपफेकचे आहेत विविध प्रकार! जाणून घ्या कसे ओळखायचे

3. अपडेट रहा

तुमच्या डिव्हाईसचे सॉफ्टवेअर, सिक्युरिटी पॅचवर्क आणि ब्राऊजिंग अ‍ॅप्स हे नियमितपणे अपडेट करणं गरजेचं आहे. जेव्हा एखादं डिव्हाईस अपडेट होतं, तेव्हा त्यामध्ये अधिक सुरक्षित फायरवॉल देण्यात येते. ज्यामुळे व्हायरस किंवा मालवेअर हल्ल्यांपासून सुरक्षा मिळते.

4. धोकादायक लिंक्स

सायबर फसवणुकीसाठी सर्वात सामान्यपणे वापरण्यात येणारा प्रकार म्हणजे धोकादायक लिंक्सवर क्लिक करण्यास सांगणे. विविध प्रकारची आमिषं दाखवणारे मेसेज, किंवा गुगलवर उपलब्ध असणाऱ्या खोट्या वेबसाईट्स या माध्यमातून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा.

Internet Safety Tips
Cyber Security : एआय अ‍ॅप्स आणि स्मार्ट होममुळे लहान मुलांना अधिक सायबर धोका; रिपोर्टमध्ये बाब उघड

5. दुप्पट सुरक्षा गरजेची

सध्या गुगल, व्हॉट्सअ‍ॅप अशा कित्येक वेबसाईट्स आणि अ‍ॅप्सवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुविधा मिळते. यामुळे तुम्हाला लॉगइन करण्यासाठी केवळ पासवर्डच नाही, तर ओटीपीची देखील मदत घ्यावी लागते. यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षा मिळते.

6. अँटीव्हायरस

मोबाईल-लॅपटॉप सॉफ्टवेअर कितीही ऑनलाईन सुरक्षा प्रदान करत असतील, तरीदेखील सायबर गुन्हेगार हल्ले करण्यासाठी नवनवीन प्रकार शोधून काढत असतात. अशा वेळी तुमच्या डिव्हाईसमधील बेसिक सिक्युरिटी लेअर पुरेशी ठरेलच असं नाही. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेणं गरजेचं आहे.

Internet Safety Tips
Hong Kong Deepfake : खोटा बॉस, खोटे अधिकारी अन् एक व्हिडिओ कॉल.. डीपफेकच्या मदतीने संपूर्ण कंपनीलाच लावला 200 कोटींचा चुना!

7. डीपफेक

आजकाल डीपफेक व्हिडिओंच्या मदतीने सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी तो व्हिडिओ बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. व्यक्तीचे एक्स्प्रेशन, डोळ्यांची हालचाल, तोंडाची हालचाल अशा गोष्टी बारकाईने पाहून तुम्ही असे व्हिडिओ ओळखू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com