Netflix ने गुपचूप वाढवले प्लॅनचे दर, जाणून घ्या नव्या किंमती | Sci-Tech News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Netflix

Netflix ने गुपचूप वाढवले प्लॅनचे दर, जाणून घ्या नव्या किंमती

इंटरनेटच्या काळामध्ये मनोरंजनसाठी चित्रपटांसोबत ओटीटीचा नाव देखील जोडले गेले आहे. आजच्या काळामध्ये नेटफ्लिक्स (Netflix) आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video सारख्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता खूप वाढत आहे. या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना तुम्हाला एक सदस्यत्व शुल्क(Mebership Fee) द्यावे लागते. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, नेटफ्लिक्सने आपल्या किंमती अचानक वाढल्या आहेत.

हेही वाचा: युद्धाचा परिणाम; रशियामध्ये घरभाड्याएवढ्या McDonald’s बर्गर किंमती

या देशांमध्ये वाढल्या Netflix Plansच्या किंमती

नेटफ्लिक्सने सध्या अशी घोषणा केली आहे की, आपल्या प्लॅन्सच्या किंमती काही देशांमध्ये वाढविणार आहे. नेटफ्लिक्सचे प्लॅल यूके(UK) आणि आयरलँन्डमध्ये महागणार आहेत. यूकेमध्ये प्लॅन्सची किंमत £1 ($ 1.31) वरून 10.99 (14.46) पर्यंत वाढली आहे.. आयर्लंडमध्ये हे प्लॅन्स आता €14.99 ($16.54) ऐवजी $2 ($2.20) मध्ये उपलब्ध असतील.

हे बदल करण्यामागचे कारण

नेटफ्लिक्सने या निर्णयामागे कोणतेही मोठे कारण सांगितले नाही. अचानक हे पाऊल उचलले असून त्याचे कारण काय आहे याबाबत कोणीही खुलासा केलेला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मने एवढेच सांगितले की, त्यांच्या या पावलामुळे यूके आणि आर्यरलॅन्डच्या यूजर्सला चांगला कन्टेंटची सुविधा देणार आहे.

हेही वाचा: जपानी विद्यार्थ्यींनींच्या Ponytailवर बंदी; म्हणे, ''ते पुरुषांना लैंगिकरित्या उत्तेजित करतं''

भारतात Netflix प्लॅनच्या किंमती

भारतामध्ये नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅनच्या किंमती 199 रुपयांपासून कमी करून 149 केली आहे. मोबाईल प्लॅन यूजर्सला 480p वर फोन आणि टॅबलेटवर व्हिडिओ स्ट्रीम करते. बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपये होती, ज्याची किंमत 199 रुपये केली आहे. आता प्रीमियम प्लॅन बाबत सांगायचे झाले तर या प्लॅनची किंमत पहिल्यादा 799 रुपये होती, आता याची किंमत 649 रुपये होती. प्रीमयम प्लॅन वापरकर्त्यांना 4K+HDR वर व्हिडिओ ब्राऊज करु देत आहे. प्रीमयम प्लॅन यूजर्सला या प्लॅनसोबत एकाचवेळी चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर पाहण्याची सुविधा देते.

Web Title: Netflix Raises Prices Again For Subscribers In Uk And Ireland

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaNetflix
go to top