
Netflix Subscription : आता स्वस्त होणार नेटफ्लिक्सचा सब्सक्रिप्शन रेट, भारतात...
Netflix Subscription Rate : काही महिन्यांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix कठिण परिस्थितीतून जात आहे. अॅमेझॉन किंवा डिझ्नी हॉटस्टार नेटफ्लिक्सला तगडी टक्कर देत आहेत. याच दबावात गुरुवारला नेटफ्लिक्सने काही देशांच्या सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
कंपनीने तगडी प्रतिस्पर्धीचा सामना करण्यासाठी आणि ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. या शिवाय कंपनीचा प्लॅनच्या खर्चात आपल्या नेटवर्कमध्ये नव्या ग्राहकांची संख्या वाढवण्याकडेही कल असणार आहे. (Netflix will reduce Netflix Subscription Plan prices in these countries read why)
नेटफ्लिक्सचा सब्सक्रिप्शन रेट का कमी होतोय?
नेटफ्लिकस 190 पेक्षा जास्त देशात वापरले जाते. अमेरिका आणि कॅनाडाच्या मार्केटमध्ये सेचुरेशन आल्यामुळे नेटफ्लिक्सन नव्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये आपली पार्टनरशिप वाढवण्याचा विचार करत आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याच्या मते, "नेटफ्लिक्स नेहमी त्यांच्या मेंबर्सला चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे काही देशात आम्ही प्लॅन अपडेट करणार आहोत."
नेटफ्लिक्स सध्या संकटाचा सामना करत आहे. कंपनीने शेअर बाजारात गुरुवारच्या व्यव्हारात 5% शेअर्स गमावले. दोन महिन्यांपासूनच्या कंपनीची स्थिती उत्तम नाही.
या देशात कमी होणार रेट
रायटर्सनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टचा दाखला देत म्हटले आहे की नेटफ्लिक्सचा सब्सक्रिप्शन रेट हा मध्य पूर्वच्या काही देशात उप-सहारा आफ्रिकी, लॅटिन अमेरिका आणि आशियाच्या काही देशात होणार. रेट कमी झाल्यानंतर ओटीटी प्लेटफॉर्मची मेम्बरशिप फिस अर्धी होणार.