'रॉयल एनफिल्‍ड'ची नवीन हिमालयन बघितली का?

New Himalayan model of Royal Enfield launched
New Himalayan model of Royal Enfield launched

रॉयल एनफिल्‍ड हिमालयनने भारत व जगभरातील अॅडवेन्‍चर टूरिंगला  केले आहे. रॉयल एनफिल्‍डचे हिमालयामधील चिरंतन ६० वर्षाच्‍या इतिहासामधून प्रेरणा घेत मोटरसायकल परिपूर्ण राइडिंग उत्‍साही, तसेच महत्त्‍वाकांक्षी साहसी रायडर्ससाठी सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह उपलब्‍ध आहे. २०१६ मध्‍ये सादर करण्‍यात आलेली ही पर्पज-बिल्‍ट मोटरसायकल वैविध्‍यपूर्ण व अस्‍सल ऑफ-रोड क्षमता असलेली मोटरसायकल आहे. हा वारसा पुढे घेऊन जात रॉयल एनफिल्‍ड या मध्‍यम-आकाराच्‍या मोटरसायकल विभागामधील जागतिक अग्रणी कंपनीने आज बीएस-६ प्रमाणित इंजिन असलेल्‍या नवीन हिमालयनच्‍या सादरीकरणाची घोषणा केली.

नवीन हिमालयनमध्‍ये मोटरसायकलची मूळ वैविध्‍यता व उत्‍साह कायम ठेवण्‍यात आला आहे. तसेच या मोटरसायकलमध्‍ये स्विचेबल एबीएस वैशिष्‍ट्याची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामधून अधिक उत्‍साहवर्धक राइड अनुभव मिळतो. एबीएस बंद ठेवण्‍याने मागील चाकावर नियंत्रण राहते आणि राइडर अगदी सुलभपणे ऑफ-रोड राइडिंगचा आनंद घेऊ शकतो. यामुळे राइडिंग उत्‍साहींसाठी अॅडवेन्‍चर टूरिंग आणि ट्रेल राइडिंग अनुभव अधिक सर्वसमावेशक व आकर्षक बनतो. राइडरच्‍या सुरक्षिततेवर अधिक फोकस देण्‍यासह नवीन हिमालयनमध्‍ये हझार्ड स्विचची भर करण्‍यात आली आहे, जे धोक्‍याच्‍या क्षणी आसपासच्‍या इतर राइडर्सना सूचना देते. याव्‍यतिरिक्‍त सुधारित ब्रेक यंत्रणा सतत गाडी थांबवावी लागत असताना देखील सुलभ राइडिंग अनुभव देते. नवीन मोटरसायकलमध्‍ये सुधारित साइड-स्‍टॅण्‍ड देखील असेल, ज्‍यामुळे कोणत्‍याही ठिकाणी सुलभपणे मोटरसायकल पार्क करता येईल.

नवीन रॉयल एनफिल्‍ड हिमालयन तीन रंगांसह दोन ड्युअल टोन रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. हे रंग राइडर्स त्‍यांच्‍या प्रवासांदरम्‍यान राइड करणा-या विविध प्रदेशांमधून प्रेरित आहेत. सध्‍याच्‍या स्‍नो व्‍हाईट, ग्रॅनाईट ब्‍लॅक, ग्रॅव्‍हल ग्रे व स्‍लीट ग्रे या रंगांमध्‍ये लेक ब्‍ल्‍यू व रॉक रेड या तीन नवीन रंगांची भर करण्‍यात आली आहे. ही मोटरसायकल ३ वर्षांच्‍या वॉरण्‍टीसह येते आणि स्‍नो व्‍हाईट व ग्रॅनाईट रंगांसाठी १८६,८११ रूपयांमध्‍ये (एक्‍स–शोरूम) भारतातील सर्व रॉयल एनफिल्‍ड स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल. स्‍लीट ग्रे व ग्रॅव्‍हल ग्रे रंगामधील मोटरसायकल १८९,५६५ रूपयांमध्‍ये (एक्‍स-शोरूम) उपलब्‍ध आहे आणि नवीनच सादर करण्‍यात आलेले ड्युअल टोन रंग रॉक रेड व लेक ब्‍ल्‍यूमधील मोटरसायकल १९१,४०१ रूपयांमध्‍ये (एक्‍स-शोरूम) उपलब्‍ध असेल.

या सादरीकरणाबाबत बोलताना रॉयल एनफिल्‍ड इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनोद दासरी म्‍हणाले, ''हिमालयन ही वैशिष्‍ट्यपूर्ण अॅडवेन्‍चर टूरर आहे. या मोटरसायकलने भारत व जगभरातील बाजारपेठांमध्‍ये चांगली कामगिरी केली आहे. २०१६ पासून हिमालयनने जगभरातील अनेक साहसांसाठी वैविध्‍यपूर्ण, उपलब्‍ध होण्‍याजोगे आणि नीडर सोबती म्‍हणून सेवा दिली आहे. अद्वितीय वैशिष्‍ट्ये व डिझाइन कार्यक्षमता असलेल्‍या नवीन बीएस-६ प्रमाणित हिमालयनचे सादरीकरण आम्‍हाला विश्‍वास देते की, ही मोटरसायकल राइडर्सच्‍या पसंतीस पडेल आणि देशातील साहसी मोटरसायकलिंगसाठी नवीन दर्जा स्‍थापित करेल.''

नवीनच सादर करण्‍यात आलेल्‍या मोटरसायकलमधून प्रेरणा घेत रॉयल एनफिल्‍ड अॅपरलची नवीन रेंज देखील सादर करणार आहे. या कलेक्‍शनमध्‍ये नवीन मोटरसायकलच्‍या रंगांना साजेसे अशा ड्युअल स्‍पोर्ट हेलमेट्सच्‍या खास रेंजचा समावेश असेल. या कलेक्‍शनमध्‍ये लाइफस्‍टाइल अॅपरल रेंज देखील आहे, ज्‍यामध्‍ये खांदा व हातांच्‍या कोप-यांसाठी वजनाने हलकी जर्सी आणि टी-शर्टस्, स्‍वेटशर्टस् व हेडगिअर्सची उत्तम रेंज आहे. हे कलेक्‍शन भारतातील रॉयल एनफिल्‍ड डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल.  

हिमालयनची टूरिंग क्षमता वाढवण्‍यात आली आहे आणि राइडिंगच्‍या वेळी स्‍टोरेज, सेफ्टी कम्‍फर्ट व कंट्रोल देणा-या रॉयल एनफिल्‍डच्‍या जेन्‍यूएन मोटरसायकल अॅक्‍सेसरीजशी पूरक आहे. सुलभ हाताळणीसाठी क्रॉस ब्रेससह अॅल्‍युमिनिअम हँडलबार सारखी अस्‍सल व होमोलोगेटेड अॅक्‍सेसरीज, अधिकतम स्‍टोरेजसाठी २६-लिटर अॅल्‍युमिनिअम पॅनिअर्सचा सेट, लांबच्‍या प्रवासासाठी अधिक आरामदायी सुविधेकरिता ३डी मेशसह टूरिंग आसने आणि सरंक्षणासाठी मोठे इंजिन गार्ड अशी काही महत्त्‍वाची वैशिष्‍ट्ये या मोटरसायकलमध्‍ये असण्‍यासोबत इतर अनेक अॅक्‍सेसरीज देखील आहेत. अभियंत्‍यांच्‍या समर्पित टीमने मोटरसायकलमधील प्रत्‍येक जेन्‍यूएन मोटरसायकल अॅक्‍सेसरीची रचना व निर्मिती केली आहे. योग्‍य फिट व दीर्घकालीन टिकाऊपणासाठी या अॅक्‍सेसरीजची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्‍यात आली आहे. अॅक्‍सेसरीज पूर्णपणे सुसंगत व होमोलेगेटेड आहेत आणि त्‍यावर २ वर्षांची वॉरण्‍टी देखील आहे.

प्रामुख्‍याने भारतीय बाजारपेठांसाठी सादर करण्‍यात आलेली हिमालयन फक्‍त देशातच नव्‍हे तर जगभरात तिच्‍या विभागामधील सर्वोत्तम अॅडवेन्‍चर टूरिंग मोटरसायकल बनली आहे. या मोटरसायकलमुळे अॅडवेन्‍चर टूरिंगच्‍या नॉन-एक्स्ट्रीम व अधिक उपलब्‍ध होण्‍याजोग्‍या पर्यायांना दिशा मिळाली आहे. नवीन हिमालयन या अंडरसर्व्‍ह विभागाला अधिक प्रबळ करेल. अ‍गदी नुकतेच हिमालयनने अॅडवेन्‍चर टूरिंग क्षेत्रामध्‍ये काही नवीन बेंचमार्क्‍स निर्माण केले आहेत. या मोटरसायकलने नवीनच निर्माण करण्‍यात आलेल्‍या अॅडवेन्‍चर व एपिक राइड्समध्‍ये राइडर्सना उत्तम सोबत दिली आहे. भारतीय सेनेसोबत काराकोरम घाटामध्‍ये किंवा तिबेटमधील भव्‍य माऊंट एव्‍हरेस्‍टच्‍या बेस कॅम्‍पपर्यंत खडतर राइड करायचे असो, हिमालयन ही अॅडवेन्‍चर टूरिंग व आव्‍हानात्‍मक राइडिंगसाठी एक परिपूर्ण मोटरसायकल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com