Honda Amaze : लवकरच तुमच्या भेटीला येतीये होंडाची 'अमेज़' ; नव्या जनरेशनसह कमालीचे सुरक्षा फीचर्स,जाणून घ्या

Honda Car Launch : गेल्या वर्षी 2023 मध्ये कंपनीने पहिली SUV, ‘होंडा एलिवेट लाँच केली.
Honda Amaze 2024
Honda Amaze 2024esakal

New Car Luanch : भारतातील होंडा कार्स चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांनी खास तयार केलेली पहिली SUV, Honda Elevate लाँच केल्यानंतर आता लवकरच नवीन जनरेशनची ‘होंडा अमेज़’ *(Honda Amaze) लाँच करण्याची तयारी करत आहे.

होंडा एलिवेट लाँच करताना कंपनीने भविष्यातील कारबद्दलही खुलासा केला होता. त्यानुसार, 2030 पर्यंत दरवर्षी एक SUV लाँच करण्याचा आणि त्यांच्या सध्याच्या कारच्या मॉडेल्सना अपडेट करण्याचा कंपनीचा मानस आहे.

होंडा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन जनरेशनची अमेज़ यंदाच्या दिवाळीच्या आधीच बाजारात विक्रीसाठी येऊ शकते.

Honda Amaze 2024
Email Translate : जगातल्या कोणत्याही भाषेत करता येतं इमेलच भाषांतर; जीमेलमधील हे फीचर वापरुन बघितलं काय?

डिजाइनच्या बाबतीत, नवीन अमेज़ची डिझाईन होंडा सिटीशी मिळतीजुळी असण्याची शक्यता आहे. त्यात फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्सचा समावेश असू शकतो. आतील भाग देखील पूर्ण नवीन असणार असून त्यामध्ये फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड डॅशबोर्ड लेआउट, प्रीमियम साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड मिरर, लेदरचीट अपहोल्स्टरी, अॅम्बिएंट लाइटिंग इत्यादींचा समावेश असू शकतो.

Honda Amaze 2024
Call History : क्षणात मिळवा कुणाचीही कॉल हिस्ट्री! जिओ अन् एअरटेलने आणलं नवीन फिचर,कसं वापरायचं जाणून घ्या

होंडा या गाडीमध्ये सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक सनरूफ देऊ शकते. तसेच, सध्या सुरक्षा वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरत असल्याने या नवीन अमेज़मध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems) देखील देण्याची शक्यता आहे.

इंजिनच्या बाबतीत, होंडा सध्याच्या मॉडेलमधील 1.2-litre नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनच वापरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यात अधिक रिफाइनमेंट आणि थोडा जास्त पॉवर मिळू शकतो. नवीन अमेज़ची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा रु. 1 लाख ते रु. 1.2 लाख अधिक असू शकते. मुंबईतील ऑन-रोड किंमत रु. 10 लाख ते रु. 14 लाख दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com