esakal | जॅग्‍वार रोव्हर वेलार भारतामध्ये ‍दाखल; जाणून घ्या किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

जॅग्‍वार रेंज रोव्हर वेलार भारतामध्ये ‍दाखल

जॅग्‍वार रेंज रोव्हर वेलार भारतामध्ये ‍दाखल

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई : जॅग्‍वार लँण्ड रोव्‍हर इंडियाने आज भारतात त्यांची नवी रेंज रोव्हर वेलार (range-rover-velar) लाँच केली आहे. या कारची भारतातील एक्स शोरुम किंमत ७९.८७ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या नव्या वेलारमध्ये इंजेनियम २.० लिटर पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्‍समधील आर-डायनॅमिक एस ट्रिममध्‍ये उपलब्‍ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ३६५ एनएम टॉर्क निर्माण करते. २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्‍ल्‍यू पॉवर व ४३० एनएम टॉर्क निर्माण करते. (new-model-of-range-rover-velar-starting-from-rs-7987-lakh)

रेंज रोव्‍हर वेलारची वैशिष्ट्ये -

या कारमध्ये ३डी सराऊंड कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक एअर सस्‍पेंशन, केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम२.५ फिल्‍टर आणि नवीन पीव्‍ही प्रो इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. तसंच ही सर्वात आकर्षक, सुरक्षित व स्‍मार्टर वेईकल असण्‍यासोबत जगातील तंत्रज्ञानदृष्‍ट्या सर्वात प्रगत लक्‍झरी एसयूव्‍ही कार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: 'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'

''रेंज रोव्‍हर वेलारमध्ये अवंत-ग्रेड डिझाइन, लक्झरी व तंत्रज्ञान यांचा समावेश असल्यामुळे ती सर्वात अस्पायरेशनल एसयूव्ही कार आहे. त्यातच नवीन डिझाइन, नवी टेक्नोलॉजी आणि सुसज्ज सुविधा यांच्यामुळे लोकप्रिय ठरत आहे", असं जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले.

loading image