Royal Enfield Himalayan : रॉयल एनफिल्डची नवी हिमालयन अखेर लाँच! इंजिनसह फीचर्सही अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या किंमत

Himalayan 450 Price : या बाईकच्या टॉप मॉडेलची किंमत 2.84 लाख रुपये (एक्स शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
Royal Enfield Himalayan
Royal Enfield HimalayaneSakal

New Himalayan 450 Price : परफॉर्मन्स बाईक बनवणारी देशातील अग्रगण्य कंपनी रॉयल एनफिल्डने आपली नवी हिमालयन बाईक अखेर लाँच केली आहे. कंपनीची आधीची Himalayan बाईक भरपूर लोकप्रिय आहेच. आता याचं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी ही बाईक कंपनीने सर्वांसमोर आणली होती. तेव्हापासूनच याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता लाँचिंगनंतर याची किंमतही समोर आली आहे. या बाईकच्या टॉप मॉडेलची किंमत 2.84 लाख रुपये (एक्स शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. अर्थात, 31 डिसेंबरच्या आधी बुकिंग केल्यास यावर डिस्काउंट मिळत आहे.

Himalayan 450 बाईकचे चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये काजा ब्राऊन रंगाचा बेस व्हेरियंट आहे. याची किंमत 2.69 लाख रुपये आहे. स्लेट हिमालयन सॉल्ट, स्लेट पॉपी ब्लू या रंगांमधील 'पास' व्हेरियंटची किंमत 2.74 लाख रुपये आहे. कॉमेट व्हाईट रंगाच्या 'समिट' व्हेरियंटची किंमत 2.79 लाख रुपये आहे. तर हेनले ब्लॅक रंगाच्या 'समिट' व्हेरियंटची किंमत 2.84 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरुम आहेत.

Royal Enfield Himalayan
CNG Bike : पेट्रोलची चिंता सोडा! आता सीएनजीवर चालणारी बाईक येणार; 'बजाज'ने दिले संकेत

याआधीचं मॉडेल Himalayan 411 ची किंमत 2.15 ते 2.30 लाख रुपये एवढी होती. याच्या तुलनेत नव्या बाईकची किंमत सुमारे 50 ते 55 हजार रुपयांनी जास्त आहे. अर्थात, यामध्ये कित्येक नवीन फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत.

नवीन इंजिन

नवीन हिमालयन बाईकमध्ये 452cc क्षमतेचं लिक्विड-कूल, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 40Hp पॉवर आणि 40Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यामध्ये गिअरबॉक्स स्लिप आणि असिस्ट क्लच असे फीचर्स असणारा 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

डिझाईनमध्येही बदल

रॉयल एनफिल्डने नवीन हिमालयन बाईकच्या डिझाईनमध्ये देखील काही बदल केले आहेत. यामध्ये जास्त गोलाकार असा फ्युएल टँक देण्यात आला आहे. जुन्या मॉडेलमध्ये तो थोडा चौकोनी असा होता. फ्युएल टँकची क्षमता देखील 17 लीटर करण्यात आली आहे. या गाडीमध्ये स्प्लिट सीट्स, साईड पॅनल्स असे फीचर्सही देण्यात आले आहेत.

Royal Enfield Himalayan
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

नवीन हिमालयन बाईकमध्ये एलईडी लाईट्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मॅप नेव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक, राईड-बाय-वायर, परफॉर्मन्स आणि इको असे दोन राईड मोड, डिजिटल सर्क्युलर डिस्प्ले, सी-टाईप चार्जिंग पोर्ट आणि स्विचेबल रिअर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) देखील देण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com