New Smartphone Technology: अबब! भविष्यात आता स्ट्रेच होणारा मोबाइल येणार; फिचर्सही असतील कमालीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Smartphone Technology

New Smartphone Technology: अबब! भविष्यात आता स्ट्रेच होणारा मोबाइल येणार; फिचर्सही असतील कमालीचे

LG latest Smartphone: फोल्डेबल आणि फ्लिप होणाऱ्या स्मार्टफोननंतर भविष्यात आता नक्की काय टेक्नॉलॉजी घेऊन फोन लाँच होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. टेक्नॉलॉजीचे नवनविन शोध चकीत करणारे आहेत. असाच एक टेक्नॉलॉजीचा नवा करिश्मा दाखवत आता LG कंपनीने चक्क स्ट्रेचेबल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे.

LG कंपनी घेऊन आलीय स्ट्रेचेबल डिस्प्ले

सध्या अनेक कंपन्या अॅडवांस टेक्नॉलॉजी वापरत नवीन फोल्डेबल आणि फ्लिप फोन लॉन्च करत आहे, पण सॅमसंगसारखा स्मार्टफोन अजून बाजारात आलेला नाही. आता LG ने असा डिस्प्ले शो केलाय, जो या सेगमेंटला चेंज देऊ शकतो.

LG कंपनीने जगातील पहिला हाय-रिझोल्यूशन स्ट्रेचेबल डिस्प्ले सादर केला आहे, जो तुम्ही फोल्ड आणि ट्विस्ट दोन्ही करू शकता. आश्चर्य म्हणजे हा स्मार्टफोन स्ट्रेच करून मोठाही करता येतो. कंपनीच्या मते, या फोनचा 12-इंचाचा डिस्प्ले 14-इंचापर्यंत स्ट्रेच केला जाऊ शकतो. यामुळे डिस्प्ले खराब होणार नाही.

हा LG डिस्प्ले तयार करण्यासाठी रेझिलिएंट फिल्मचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की, या डिस्प्लेमध्ये मायक्रो-एलईडी लाईटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने लिनियर वायर्ड सिस्टीम ऐवजी S आकाराची स्प्रिंग वायर्ड सिस्टीम वापरली आहे. त्यामुळे नक्कीच जेव्हा ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे विकसित होईल, तेव्हा ते स्मार्टफोन आणि इतर प्रदर्शन उत्पादनांना नवीन दिशा देईल.

कपड्यांमध्येही डिस्प्ले लावला जावू शकतो का?

ब्रँडच्या मतानुसार, हा डिस्प्ले कपडे, फर्निचर, ऑटोमोबाईल आणि विमानात वापरला जाऊ शकतो. हलक्या वजनाच्या डिझाइनमुळे या टेक्नॉलॉजीचा वापर पोर्टेबल डिवाईस बनवण्यासाठी केला जाऊ शकतो, असेही कंपनीचे म्हणणे आहे. त्याच्या मदतीने, गॅजेट्सचे वजन कमी ठेवण्यास मदत होईल.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

दक्षिण कोरियातील अनेक ऑर्गनायझेशन च्या मदतीने ते या उत्पादनावर काम करत असल्याचे LG ने स्पष्ट केल आहे. पण, आतापर्यंत केवळ ही टेक्नॉलॉजी दाखवली गेली आहे. हे अजून कोणत्याही व्यावसायिक उपकरणात वापरलं गेलेलं नाही. पण अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की, लवकरच आपल्याला स्मार्टफोन किंवा इतर कोणते प्रॉडक्ट स्ट्रेचेबल डिस्प्ले वर काम करताना बघायला मिळेल.