कोकणात वैरणीसाठी तमिळनाडूचे नवीन वाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

सावंतवाडी - कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक आहार दुधाळ जनावरांना मिळावा म्हणून नवीन वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे, अशी माहिती खोपोलीतील कृषी अभ्यासक ॲड. जयंत मुळेकर यांनी दिली.

दुधाळ जनावरांना लागणारा सकस चारा  कोकणात निर्माण होत नव्हता. त्यामुळे ज्वारीचा कडबा, उसाचे बाड आयात करावे लागत होते. उन्हाळी दिवसांमध्ये हिरवी वैरण नसल्यामुळे खुराकाचा खर्च अवास्तव होऊन हा व्यवसाय फायदेशीर ठरत नव्हता. ही गरज लक्षात घेवून तामिळनाडूतील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी वैरणीचा फार उत्तम जाती शोधून काढल्या आहेत.

कोकणातील काही शेतकऱ्यांना आपण प्रायोजिक तत्त्वावर हे वाण लागवडीत दिले. त्याचा अनुभव फार उत्साहवर्धक दिसून आला. एकदा लागवड केली की पहिली कापणी ६५ दिवसांनंतर घेता येते व नंतरच्या कापण्या ३५ते ४० दिवसांच्या अंतराने घेता येतात. एकदा लागवड केली की सतत पाच वर्षे कापण्या घेता येतात. या वाणाचे एक पान जवळजवळ ५५ इंच लांब असते व खोडावर ही पाने एकमेकास लागून फुटलेली असतात असेही त्यांनी यात म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New varieties of Tamilnadu as fodder in Konkan