सोशल संकल्प ! (स्मार्ट सोबती )

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

ए हाऽऽय! 
हाऊ आर यू यार?... हाऊ आर यू ऑल?... 
कितने दिनों बाद मिल रहे हैं... दिन काय.. वर्षं... चांगली दोन वर्षं... 365 x 2= 730 दिवस! काय चेष्टा आहे का राव... इतके दिवस न भेटताही... 

ए हाऽऽय! 
हाऊ आर यू यार?... हाऊ आर यू ऑल?... 
कितने दिनों बाद मिल रहे हैं... दिन काय.. वर्षं... चांगली दोन वर्षं... 365 x 2= 730 दिवस! काय चेष्टा आहे का राव... इतके दिवस न भेटताही... 
अर्रे डोन्ट वरी... वैसे भी हमारी दोस्ती मिलने-बिछडने की मोहताज तो नहीं हैं! मिलें, तो सोने पे सुहागा; ना मिले, तो भी ये मजबूत जोड है... डायरेक्‍ट दिलसे दिल का बॉंडिंग ! नहीं?... एनिवेज. इतक्‍या दिवसांत मी तुम्हाला कित्ती कित्ती कित्ती "मिस'...केलं माहिताय?... असं मात्र नाही हं बिल्कुल म्हणणार. कारण "मिस्‌' करायला, आठवण "यायला'... ती "गेलीच' कुठे होती मुळात? अरे फ्रेंडस्‌-दोस्तलोग तो हमेशा दिल में बसा करते हैं ना? सो, यू ऑल आर इन माय हार्ट! ऍन्ड फॉर ऑलवेज! ऑफकोर्स, आय मीन इट!... 
""मग आता एवढ्या सगळ्यांना हृदयात साठवून साठवून हृदयाचा आकार चांगला मोठ्ठा झाला असेल, नै?''...बोल्लंच का कुणी किडकु-मिडकु? हरकत नाही! दोन वर्षांच्या गॅपचे उट्टे काढायचे असतील. काढा काढा. तसेही अजून तिळगूळ द्यायचे आहेत. त्यामुळे घ्या तिखट-कडू बोलून बोलून! अपुनको फर्क नहीं पडता! बोले तो बिन्दास... इसीलिए तो... खाली "हार्ट' कायकू... पुरा "घेरा' बढ गयेल्ला हैं इतने दिनों में! बट डोन्ट वरी, सुनर ऑर लॅटर... आय विल कम बॅक इन माय ओरिजिनल शेप... वो भी विदाऊट डिस्टर्बिंग माय "फ्रेंडफुल्ल' हार्ट!... "मैत्रभरल्या' हृदयाला जर्राही धक्का न लावता!! 
अर्रे, त्यात काय अवघड आहे? न्यू इयर रिझोल्युशन्स... नव्या वर्षाचे संकल्प.. कशासाठी असतात ते? ठरवून प्रयत्नपूर्वक पुरे करण्यासाठीच ना? मी तर केलाय... अंहं, "केलाय' नाही, "केलेत!' एक नाही, दोन! एक तर तो... "गेट इन शेप-इन अ इयर' आणि दुसरा... जऽऽरा ऑड वाटेल तुम्हाला, पण मला आपला, अग्दी "मस्ट' असा नाही पण करायला हवा किंवा करायला हरकत नाही, असा वाटला म्हणून केलेला संकल्प, हा की, वर्षभरात, एखादं तरी "सक्तीचं नसलेलं' असं काम नियमानी करायचं! अंऽऽऽ नेमकं समजलं नाही, हो ना? 
ओके. असं बघा, की, सक्तीची, टाळता न येणारी कामं तर रोजच्या रोज प्रत्येकाला करावीच लागत असतात. प्रत्येकालाच! नै का? म्हणजे विस्कटूनच सांगायचं तर जसं, तुम्हा मुलांना गजरच्या तालावर उठायचं-आवरायचं-शाळा-कॉलेजात पळायचं-अभ्यास करायचं... किंवा जसं आईला रोज स्वयंपाक-घरकामं करायचं... किंवा जसं बाबांना ऑफिसला किंवा कामाला जावून पैसे मिळवून आणायचं... वगैरे काम अपरिहार्य असतं, त्यांची आपली आवड-इच्छा असो वा नसो, मन-मूड असो वा नसो... ते ते काम करणं त्यांना जसं भागच असतं, त्याशिवाय गत्यंतरच नसतं... थोडक्‍यात, ही कामं करण्याचं या सगळ्यांना एक कंपल्शनच असतं, सक्ती असते... ती नाही केली तर या सगळयांना कुणा ना कुणाकडून ओरडा खावा लागतो किंवा कुठल्या ना कुठल्या रूपात त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागते... अशी "सक्ती "नसलेलं' एखादं काम मला आवडीने आणि नित्यनियमानं करायचंय ! कुणाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली न दबलेलं आणि कुणावर उपकार करतोय अशा न भावनेचं, केवळ-निव्वळ "आपल्या' आनंदासाठी, पण ज्याने स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाचं, फ्रेंडसर्कलचं आणि एकूणच समाजाचंही काही भलं होईल, चांगलं होईल... अस्सं काही काम मला करायचंय. जे मी नाही केलं, तर कोणी मला काही जाब विचारणार नाही; पण जर केलं, तर नक्कीच, मला आणि इतरांनाही सकारात्मक जीवनाची एक ऊर्जा मिळेल असं, मानसिक समाधान मिळेल, असं काही! 
अर्थात हे "असं काही' म्हणजे काहीही असू शकतं! पण काहीही म्हणजे "काहीही' नाही, हे लक्षात येतंय ना तुमच्या?... बेसिकली, तुम्हाला सांगायला हरकत नाही, धिस आयडिया इज नॉट माईन! म्हणजे आयडिया माझीच आहे, माझ्याच मनाला जे वाटलं, त्यावरूनच आलेली आहे, पण ती.. इन्स्पायर्ड बाय समबडी एल्स! दुसऱ्या एका व्यक्तिचं वागणं, विचार करणं पाहून! ए, त्या इन्स्पीरेशनची, प्रेरणेची "श्‍टोरी'च सांगू का तुम्हाला?... असंही इतके दिवस न भेटल्यामुळं तुम्हाला काय सांगू नि कित्ती सांगू, असं झालंच आहे मला... ( का? पोटात गोळा आला का रे भीतीनं?... आता या बयेची पकवा-पकवी पुन्हा सुरू... म्हणून?... खुश्‍शाल म्हणा... रूसून-बिसून बसून मी माझं काम थांबवणाऱ्यातली नाही हो @, हे लक्षात ठेवा!@) 
असो, तर माझ्या ह्या आयडियाच्या मागची गोष्ट! 

लुक. आमचे एक शेजारी. शामकाका. साधारण पन्नास-पंचावन्नचे असतील. त्यांना प्रसिद्धी आवडत नाही, म्हणून त्यांचं पूर्ण नाव किंवा पत्त्याचा संदर्भ देत नाही; पण, त्यांनी छंदासारखं जोपासलेलं एक काम मात्र मला खूप वेगळं, मोठं, महत्त्वाचं आणि अनुकरणीयही वाटतं म्हणून ते तुम्हा सर्वांपर्यंत पोचवतेय. तर, साधारण दहाएक वर्षांपूर्वी काकांच्या मुलाला अपघात झाला होता. कसा? तर तो सकाळी सकाळी कॉलेजला जाताना एका वळणावर बाईक स्लीप होऊन पडला आणि त्याच्या उजव्या डोळ्यात, कपाळ, डोक्‍याच्या बाजूला वगैरे काचा घुसून त्याचा तो डोळा कायमचाच अधू झाला. खरं तर त्या वळणावर आदले रात्री दुसरा एक अपघात झाला होता नि अपघातग्रस्त गाड्या हलवल्या तरी त्या गाड्यांच्या फुटलेल्या काचा तशाच रस्त्यावर पडून होत्या, ज्यांनी काकांच्या मुलाच्या डोळ्याचा बळी घेतला होता! त्याच दिवशी त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेकांच्या टू व्हीलर त्या काचा घुसून पंक्‍चर झाल्याच्या, त्यामुळे अनेक लोकांच्या कामांचा खोळंबा झाल्याच्या वा इतर अनेक समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडल्याचंही काकांना ऐकायला मिळालं होतं. 
खरं तर फ्रेंडस्‌, अशा घटना ज्यांच्या बाबतीत घडतात, त्यांच्यासाठी त्या मन:स्ताप देणाऱ्या तर असतातच; शिवाय बरेचदा त्या शारीरिक-आर्थिक भुर्दंड बसवणाऱ्या किंवा कधी कधी एखादी जन्मभराची दु:खद वा जीवघेणी आठवण देणाऱ्याही ठरतात. अपघातस्थळी वेळीच सफाई झाली तर पुढील अनेक अनर्थ टळूही शकतात; पण असं खूपदा होत नाही. आपण पाहतोच! (आणि सोयीस्कर दुर्लक्ष करून, काहीच न झाल्याच्या अविर्भावात, पुढे चालूही लागतो...नै?) पण, पण दोस्तहो, इथेच, काकांचं वेगळेपण जाणवतं. कारण त्या घटनेनंतर काकांनी एक निर्धार केला आणि तो आजतागायत अखंड सुरूच आहे... ऑफिसला, फिरायला, कामानिमित्त आसपासच्या गावी... कधीही कुठेही जाताना, जर, रस्त्यात अपघाताच्या काचा पडलेल्या दिसल्या, तर काका, आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावतात. गाडीच्या डिकीतून कायमसाठी ठेवलेली सुपली, छोटा झाडू आणि ताडपत्रीची पिशवी काढतात. त्या काचा गोळा करतात आणि सुपलीने पिशवीत भरून जवळपासच्या मोठ्या उंच कचरा कोंडाळ्यात टाकतात. मित्रहो, हा कोंडाळा छोटा, उघडा असेल तर त्यात ते काचा टाकत नाहीत. कारण अशा कोंडाळ्यात भटके प्राणी, पक्षी, कधी कधी भटके, वेडे, भिकारीही खाद्य शोधण्याच्या निमित्ताने वावरत असतात ना आणि त्यामुळे त्यांनाही इजा होऊ शकते की नाही? 
दोस्तलोग, काकांच्या या धंद्यामुळं बरेचदा त्यांना ऑफिसात लेटमार्क पडतो, त्यांचं स्वत:चं एखादं महत्त्वाचं काम बाजूला पडतं; पण, पण अपघातस्थळ मात्र काचामुक्‍त होतं आणि पुढच्या अनेक प्रवाशांचे मार्ग तरी संकटमुक्‍त होतात-सुकर होतात ! 

फ्रेंडस्‌, संकल्प तर कधी ना कधी सिद्धीस जातात, पूर्णत्वाला येतात. पण काकांनी जे काम हाती घेतलंय ते संकल्पाच्याही पुढचं एक व्रत आहे. अव्याहतपणे सुरु राहणारं... ज्या व्रताचा वसा, कुणीही-केंव्हाही घेऊ शकेल, अस्सं! त्यावरून मलाही असं वाटलं, की आपणही... 

वॉट डू यू थिंक? ऍम आय राईट, ऑर रॉंग? डिड यू लाईक धिस आयडिया?... खात्री आहे! 
अरे बट वॉट अबाऊट यू? तुमच्या संकल्पांबद्दल तर बोल्लोच नाही आपण! 
ओके, नेक्‍स्ट वीक! तोवर तुमचे संकल्प टिकताहेत का पहा. कारण एक जानेवारीला केलेले बऱ्याचजणांचे संकल्प आठ-दहा तारीखही पहात नाहीत, ही जनरल फॅक्‍ट असते, नै का?... बाय दि वे... या काकांसारखेच तुमच्याही ऐकण्या-पाहण्यात कुणाचे असे "उपयोगी' सोशल संकल्प असतील, तर इथं जरूर शेयर करा. ज्यांना काही करायची इच्छा आहे; पण मार्ग सापडत नाही, अशांना उपयोगी पडतील ते, हो ना?... 
टिल देन विश यू ऑल... हॅप्पी हॅप्पी हॅप्पी मकर संक्रांती, ऍन्ड, द होल हॅपी न्यू इयर!!! 
आणि हॅलो, तुम्हाला पुन्हा भेटताना मला खर्रंच खुप आनंद झालाय यार... लव्ह यू ऑल ! लव्ह यू... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new year social resolution