सोशल मीडियात ऍमेझॉनचे पाऊल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवे ऍप्लिकेशन "स्पार्क' दाखल

न्यूयॉर्क : ऍमेझॉन कंपनीने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. उत्पादनांची खरेदी व विक्री करण्यासाठी कंपनीने सोशल मीडियाप्रमाणे वैशिष्ट्ये असलेले "स्पार्क' हे ऍप्लिेकशन सुरू केले आहे.
सध्या "स्पार्क' ऍमेझॉनचे प्राइम सदस्यत्व असलेल्या ग्राहकांना वापरता येणार आहे.

स्पार्कवर अन्य सोशल मीडियाप्रमाणे छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करता येणार आहेत. ऍपलच्या "आयओएस' ऑपरेटिंग सिस्टीमवर हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांच्या पोस्टमध्ये या ऍपद्वारे उत्पादने टॅग करता येणार असून, दुसरे ग्राहक या पोस्टमधील उत्पादनांची खरेदी थेट करू शकतील. तसेच फेसबुकवरील लाइकप्रमाणे येथे आवडल्याची खूण स्माइल्स असणार आहे.

ग्राहकांना एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेत खरेदीचा आनंद घेता येईल. तसेच उत्पादनांविषयीचे अनुभव शेअर करता येणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. ऍमेझॉनच्या अनेक ग्राहकांनी नवे ऍप्लिकेशन इन्स्टाग्राम आणि पिन्टरेस्ट यांचे मिश्रण असून, त्याला ई-कॉमर्स आधार घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new york news Amazon enter in social media