मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स | Maruti Brezza | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Maruti Suzuki ने अलीकडेच आपली दुसरी जनरेशन सेलेरियो हॅचबॅक भारतात लॉन्च केली. या हॅचबॅकची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये आहे. या दरम्यान कंपनी आपल्या XL6, Baleno, Alto, Ciaz आणि Ertiga MPV चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र मारुती सुझुकीची Vitara Brezza SUV च्या अपडेटेड व्हर्जनची ग्राहक आतुरतेने वाट पाहात आहेत. कंपनी ब्रेझाच्या नेक्स जनरेशनची टेस्टींग करत आहे आणि पुढच्या वर्षी ती बाजारात दाखल होऊ शकते.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

काही मिडीया रिपोर्टनुसार, कंपनीच्या नवीन ब्रेझामध्ये नवीन हीटेक्ट प्लॅटफॉर्मसह अपडेटेड इंटीरियर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल. याशिवाय, Brezza 2022 च्या मागील आणि समोर अनेक कॉस्मेटिक बदल देखील पाहायला मिळतील. विशेष म्हणजे नवीन ब्रेझ्झाचे इंटीरियर देखील पूर्णपणे नवीन असेल. यामध्ये, नवीन सेंट्रल कन्सोल आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पुन्हा डिझाइन केलेल्या डॅशबोर्डसह दिले जाऊ शकतात. एवढेच नाही तर 2022 च्या Brezza SUV मध्ये आम्ही अपडेटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील पाहायला मिळू शकते. ही इन्फोटेनमेंट सिस्टीम ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसोबत येईल आणि यामध्ये व्हॉइस रेकग्निशन फीचर देखील देण्यात येईल.

हेही वाचा: पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

मारुती सुझुकी नवीन ब्रेझामध्ये फॅक्टरी फिट इलेक्ट्रिक सनरूफ देखील देऊ शकते असा दावा केला जात आहे. कंपनी फक्त SUV च्या टॉप-एंड व्हेरियंटमध्ये सनरूफ देऊ शकते. त्यासोबतच नवीन Brezza मध्ये कनेक्टेड कार फीचर्स, वायरलेस चार्जिंग सिस्टीम, नवीन AC युनिट, पॉवर्ड ORVM, टॉप-एंड व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज यांसारखी प्रीमियम फीचर्स देखील पाहायला मिळतील.

अशी अफवा आहे की, कंपनी नवीन Brezza मध्ये 1.5L K15B पेट्रोल इंजिन ऑफर करणार आहे, जे 48V हायब्रिड सिस्टमसह येईल. एसयूव्हीचे पेट्रोल इंजिन 138Nm टॉर्क आणि 103bhp पॉवर देईल. कंपनी नवीन Brezza CNG प्रकारातही लॉन्च करू शकते जे 91bhp पर्यंत पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, ते 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते.

loading image
go to top