esakal | तुमच्या फोनमध्ये लवकरच येणार Android चे पुढले वर्जन; प्रायव्हसीची चिंता नाही, जाणून घ्या फिचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

android 12

Google या वर्षाच्या अखेरीस Android 12 लाँच करू शकेल अशी बातमी आहे

तुमच्या फोनमध्ये लवकरच येणार Android चे पुढले वर्जन; प्रायव्हसीची चिंता नाही, जाणून घ्या फिचर्स

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: यावर्षी अँड्रॉइडचे पुढील वर्जन ( Android 12) येणार आहे.  Google ने नवीन बदलांसाठी तयारीही केली आहे. कंपनी दरवर्षी आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) लाँच करत असते. मागील वर्षी कंपनीने अँड्रॉइड 11 लॉन्च केले होते. पण त्यात कोणतेही मोठे अपग्रेड्स दिसून आले नव्हते. आता युजर्सना Android 12 कडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कंपनीच्या या नव्या ओएसमध्ये युजर्संना नोटीफिकेशनमध्ये बदल दिसतील. याबद्दलची बरीच माहिती लीक झाली आहे. चला तर जाणून घेऊया Android 12 मधील काही फिचर्स-

कधी होणार लाँच-
Google या वर्षाच्या अखेरीस Android 12 लाँच करू शकेल अशी बातमी आहे. Android Central च्या अहवालानुसार कोरोनामुळे गुगुलचे बरेच कर्मचारी घरून काम करत आहेत. त्यामुळे Android 12 थोडा वेळ लागू शकेल. जास्तीत जास्त ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये Android 12 लाँच होण्याची शक्यता आहे.

फेसबुकचेही येतेय स्मार्टवॉच, ते असेल एकदम खास

Android12 मधून लीक झालेल्या माहितीनुसार ओएस इंटरफेसमध्ये बरेच बदल केले गेले आहेत. हे बदल नोटिफिकेश पॅनेल, राउंडेड कॉर्नर, प्रायव्हसी फिचर आणि विजेट सेक्शन दिसू शकतात. नोटिफिकेशन पॅनेल गोल आकारात दिसू शकतो.

सुरक्षेसंबंधी काही नवीन फिचर दिसू शकतात. यात अ‍ॅप परमिशनचाही समावेश असेल.
नोटिफिकेशन स्क्रीनमध्ये 6 टाइल्सच्या जागी 4 शॉर्टकट की असतील.

ट्रान्सपरेंसीला काढून त्या ठिकाणी बॅकग्राउंड ओपेक लाईट दाखवली आहे. याचा कलर थीमनुसार समोर येईल. जो डार्कही होऊ शकतो.

तुम्ही जीमेलचं 'कॉन्फिडेन्शिअल मोड' वापरलंय का ? या फिचरबद्दल जाणून...

मागील काही दिवसांत गुगलच्या इंटरफेसमध्ये काही विशेष बदल दिसले नाहीत. आता अशात Android 12 वेगळा दिसू शकतो.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top