esakal | Nexzu mobility ची ई-सायकल लाँच; एका चार्जिंगमध्ये 100 किमी धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

Nexzu mobility ची ई-सायकल लाँच; एका चार्जिंगमध्ये 100 किमी धावणार

Nexzu mobility ची ई-सायकल लाँच; एका चार्जिंगमध्ये 100 किमी धावणार

sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबईः भारतातील ई-मोबिलिटी ब्रॅंड 'नेक्सझू मोबिलिटी'ने मेड इन इंडिया, लॉन्ग रेंज 'रोडलर्क इलेक्ट्रिक सायकल' नुकताच भारतात लाँच केली. जी एकदा चार्ज केल्यावर १०० किमी. धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या सायकलमध्ये मजबूत कोल्ड रोल्ड स्टील फ्रेम, ऑटोमोटिव्ह ग्रेड बिल्ड गुणवत्ता, सहज काढता येणारी बॅटरी आणि ड्युअल डिस्क ब्रेक आदी फीचर्स देण्यात आली आहेत. नवीन रोडलार्क बहुतांशी इलेक्ट्रिक आणि पेट्रोल स्कूटर्ससोबत स्पर्धा करण्याची क्षमता ठेवते.

रोडलर्कमध्ये 'ड्युअल बॅटरी सिस्टम' असून, मुख्य बॅटरी ८.७ एएचच (Ampere Hour) आणि दुसरी ५.२ एएचची इन-फ्रेम बॅटरी आहे, जी घरगुती सॉकेटवर चार्ज करता येते. या नवीन रोडलर्कमध्ये पेडलेक मोडवर तब्बल १०० किमी राईडिंग रेंज तर थ्रोटल मोडवर ७५ किमी रेंज देण्यात आली आहे. सुरक्षित आणि आरामदायक रायडिंग अनुभवासाठी ही ई-बाइक ताशी २५ किमी गती देते. सुरक्षित व आरामदायक रायडिंगसाठी मजबूत फ्रन्ट सस्पेन्शन यात आहे. या नवीन रोडलार्कची किंमत ४२ हजार रुपये आहे.

"ही सायकल मुख्य दैनंदिन वाहतुकीचे साधन म्हणून वापरता येऊ शकते. यामध्ये ६ वेगवेगळे राईडिंग मोड आहेत. इलेक्ट्रिक सायकलीचे आरोग्यविषयक फायदे असतात आणि नवीन सुपर लॉन्ग रेंज रोडलर्कच्या माध्यमातून ग्राहककेंद्री, किफायतशीर आणि स्वच्छ मोबिलिटी पर्याय सादर करताना आम्हाला आनंद होतोय," असं नेक्सझू मोबिलिटीचे राहुल शोनक म्हणाले.

संपादन : शर्वरी जोशी

loading image
go to top