
NISAR उपग्रहाने १२ मीटरचा रडार अँटेना उघडून पृथ्वी निरीक्षणासाठी मोठा टप्पा गाठला.
हा उपग्रह दर १२ दिवसांनी पृथ्वीचे स्कॅन करून आपत्ती आणि पर्यावरणीय बदलांवर डेटा देईल.
२०२५ च्या अखेरीस सुरू होणारा हा डेटा अन्न-पाणी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाला सक्षम करेल.
NISAR Satellite : नासा आणि इस्रोच्या एकत्र प्रयत्नांनी विकसित केलेल्या NISAR (नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार) उपग्रहाने अंतराळ संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ३० जुलैला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाचा १२ मीटर व्यासाचा रडार अँटेना रिफ्लेक्टर अवकाशात यशस्वीरित्या उघडण्यात आला आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) ने याची पुष्टी केली असून हा उपग्रह आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचे अचूक निरीक्षण करण्यास सज्ज आहे. या मोहिमेद्वारे नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि अन्न पाणी सुरक्षेसाठी महत्त्वाचा डेटा मिळणार आहे.