
नीती आयोगाने (NITI Aayog) पहिल्यांदाच PhonePe च्या सहकार्याने, फिनटेक इंडस्ट्रीचे (Fintech Industry) महत्त्व विषद करण्यासाठी हॅकाथॉन स्पर्धेचे (Hackathon) आयोजन केलं आहे. फिनटेक इकोसिस्टमचा मार्ग हॅक करुन तोडू शकणारे उपाय दाखवून देणं हे या हॅकाथॉनचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी आहे. तसेच त्यासाठीची अंतिम प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी आहे. या हॅकाथॉनमधील विजेत्यांची घोषणा 28 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
21 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता हॅकाथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लाईव्ह सेशन असेल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 5 लाख रुपयांचं आकर्षक रोख बक्षीस दिलं जाईल. टॉप 5 विजेत्यांना खालील रोख पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे.
प्रथम क्रमांक: संघासाठी रु. 1,50,000 – 1 बक्षीस
द्वितीय क्रमांक: संघासाठी रु 1,00,000 - 2 बक्षीस
तृतीय क्रमांक: संघासाठी 75,000 रुपये – 2 बक्षीसे
या स्पर्धेत सादर केलेल्या हॅकनुसार, परीक्षक कमी किंवा जास्त विजेते निवडण्याचा निर्णय घेऊ शकतात.
नोंदणी करण्यासाठीची लिंक पुढीलप्रमाणे : https://cic.niti.gov.in/fintech-open-month-hackathon.html.
हॅकाथॉनमधील सहभागींनी बेस म्हणून अकाऊंट एग्रीगेटर सारख्या प्रोग्रामसह PhonePe पल्स सारखे कोणतेही ओपन-डेटा API वापरणे आवश्यक आहे.
आर्थिक समावेशावर भर देऊन कर्ज, विमा किंवा गुंतवणुकीसाठी पर्यायी रीस्क मॉडेल
वित्तीय सेवांचा व्यापक अवलंब करण्यासाठी वेगवेगळे डेमोग्राफिक्स आणि भौगोलिक क्षेत्रांसाठी पॉवर डेटा सिग्नल वापरणारे नवनवे प्रोडक्ट्स
डिजिटल पेमेंट डेटामधून प्राप्त केलेले व्हिज्युअलायझेशन आणि इंटिलिजन्स
सहभागींनी तयार केलेल्या अॅपमध्ये वरीलपैकी कोणतीही एक बाब समाविष्ट करणे आवश्यक आहे.
स्पर्धक त्यांचे हॅक विकसित करण्यासाठी खालील सँडबॉक्स प्लॅटफॉर्म वापरू शकतात.
Setu AA Sandbox
Setu Payments Sandbox
The post Niti Ayog आणि PhonePe ने FinTech Hackathon 2022 साठी 5 लाख रुपयांच्या बक्षीसांची घोषणा केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.