नो पार्किंग रोखणारे हायटेक स्टिकर

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या चार चाकी गाड्‌या त्वरित हलविण्यासाठी विनात्रासाचा एक चांगला उपाय शोधण्यात आला आहे. गाडीच्या खिडकीवर बसविलेल्या हाय टेक टोस्टॉप स्टिकरच्या मदतीने ट्रॅफिक पोलिस चालकाला वॉर्निंग देऊ शकतो. फ्रॅंकफर्ट मधील डॅनिअल कॅलिओनटिझ्स या आयटी सल्लागाराने हा स्टिकर विकसित केला आहे.

चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केलेल्या चालकाची गाडी ओढून नेण्याऐवजी त्याला गाडी हलविण्याची एक संधी देऊन त्याचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी या स्टिकरची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटून नागरिक आणि पोलिसांचे नाते चांगले राहण्यास मदत होईल. हा स्टिकर सक्‍शन पॅड्‌स वापरून खिडकीच्या काचेवर चिकटवला जातो.

ट्रॅफिक पोलिसाने या स्टिकरला स्पर्श करताच एक ऑटोमेटेड मेसेजद्वारे चालकाला गाडी हलविण्याची सूचना केली जाते. चालकाकडून आलेला मेसेज ट्रॅफिक पोलिसाला या स्टिकरवर पाहता येईल. यूएसबी केबल वापरून हा स्टिकर रिचार्ज करता येईल. जर्मनीतील वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि किफायतशीर करण्याच्या उद्देशाने अयोग्य ठिकाणी लावलेली वाहने त्वरित हटविण्यासाठी हा पर्याय शोधण्यात आला आहे. या स्टिकरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी डॅनिअल सध्या निधी गोळा करत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No parking sticker to occur Hi tech

टॅग्स