
Nobel Prize 2025 Physics Awards
esakal
Nobel Prize in Physics 2025 : यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क (83), मिशेल एच. डेव्होरेट (72) आणि जॉन एम. मार्टिनिस (67) या तीन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. 1980 च्या दशकात केलेल्या त्यांच्या क्वांटम टनलिंगवरील संशोधनाने डिजिटल संवाद आणि संगणन क्षेत्रात क्रांती घडवली आहे. या संशोधनाने सूक्ष्म क्वांटम विश्वातील गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा मानवी स्तरावर उपयोग दाखवला, ज्यामुळे क्वांटम संगणक आणि संवेदनशील मापन उपकरणांचा पाया रचला गेला.