
Noise Smartwatch : जगभर फिरताना पायलटला सुचली भन्नाट आयडिया अन् उभं राहिलं स्मार्टवॉचचं साम्राज्य
Noise Smartwatch : भारतात आजच्या घडीला बरेचसे स्मार्टवॉच, हेडफोन, इअरफोन आणि वेअरेबल मार्केटमध्ये तुम्हाला ब्रँडेड ते प्रीमियम किंमतीच्या रेंजची अनेक उत्पादने मिळतील. या सेक्शन मध्ये अनेक भारतीय ब्रँड्सनी आपली छाप पाडली आहे. यातलाच एक ब्रँड आहे नॉईज.
2014 मध्ये अमित खत्री आणि गौरव खत्री या दोन भावांनी नॉईज नावाची कंपनी सुरू केली. पण मग हे नाव त्यांना कसं सुचलं? किंवा मग त्यांच्या हेडफोन ब्रँडचं नाव त्यांनी 'नॉईज' असच का ठेवलं? ही कंपनी सुरू करण्याची मूळ कल्पना त्यांना कुठून आली?
तर कंपनीचे मार्केटिंग हेड शंतनू चौहान यांनी 'नॉईज'विषयी माहिती दिली. नॉईज सलग 3 वर्षांपासून भारतातील सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टवॉच आहे. त्याची आकडेवारी आयडीसी दरवर्षी प्रसिद्ध होत असते.
शंतनू चौहान यांनी सांगितलं की, नॉईजचे संस्थापक गौरव खत्री हे व्यवसायाने व्यावसायिक पायलट आहेत. यामुळे ते जगातील अनेक ठिकाणी फिरले. जेव्हा ते परदेशात जायचे तेव्हा ते अनेकदा पाहायचे की इअरफोन, हेडफोन यांसारखी चांगल्या दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे त्यांच्याकडे सहज उपलब्ध आहेत. पण भारतातल्या लोकांना तितकीशी सुविधा नाही, किंबहुना या वस्तू उपलब्धही होत नाहीत. त्यामुळे असाच एखादा ब्रँड सुरू करण्याचा विचार त्यांनी केला.
भारतात हा सेगमेंट वाढला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे गौरव खत्रीने त्याच्या भावासह 2014 च्या शेवटी नॉईज नावाची कंपनी सुरू केली. नॉइजने सुरुवातीला मोबाईल फोनच्या ॲसेसरिज बनवल्या. त्यानंतर 2018 मध्ये कंपनीत मोठा बदल झाला.
2018 मध्ये कंपनीने मोबाइल अॅक्सेसरीजच्या पलीकडे जाण्याची योजना आखली आहे. यासह, कंपनीने वेअरेबल मार्केटमध्ये प्रवेश केला. कंपनीने इअरपॉड्स आणि स्मार्टवॉच यांसारख्या विभागांमध्ये प्रवेश केला. आयडीसीच्या आकडेवारीचा दाखला देत शंतनु म्हणाले की, स्मार्टवॉच विभागात कंपनी गेल्या 3 वर्षांपासून अव्वल स्थानावर आहे.
नॉइज हे नाव कुठून आलं?
'नॉईज' हे ब्रँड नेम ठेवण्याची कल्पनाही गौरव आणि अमित यांची होती. वास्तविक हे नाव फिलोसॉफीवर आधारित आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचे हेडफोन वापरता तेव्हा बाहेरील 'आवाजा' ऐवजी तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाशी कनेक्ट होता. सुरुवातीला, नॉईजने चीन, तैवान आणि अगदी जर्मनीमधून आपली उत्पादने आयात केली. आता कंपनी तिच्या 90 टक्के स्मार्टवॉचचे उत्पादन फक्त भारतात करते.