Travel Blog : वर्दळीपासून दूर असलेल्या या गावात राहतात कौरव पांडवांचे वंशज!

Travel Blog on Mahabharat characters
Travel Blog on Mahabharat charactersEsakal

Best Uttarakhand Tourism Places : प्राचीन काळापासून भारत ही ऋषी, संत आणि देवतांची भूमी आहे. यामुळेच याला देवभूमी असेही म्हणतात. येथे वर्षभर पर्यटक येत असतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उत्तराखंडमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. परंतु आजही अशी काही ठिकाणे आहेत, जी लोकांच्या नजरेतून लपलेली आहेत.

देहरादूनपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेले येथील कलाप गाव यापैकी एक आहे. हे गाव त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या भागापासून पूर्णपणे विभागलेले आहे.

इथे पायीच ट्रेकिंगला जावे लागते. कारण इथे जाण्यासाठी कोणताही रस्ता किंवा इतर साधन नाही. पण, तरीही पर्यटक इथे गर्दी करतात. हे कौरव आणि पांडवांचे गाव आहे.

Travel Blog on Mahabharat characters
Travel Blog on Mahabharat characters

असे म्हणतात की, आजही कौरव,पांडवांचे वंशज या गावात राहतात. येथील ग्रामस्थ स्वतःला पांडव आणि कौरवांचे वंशज मानतात. शिवाय महाभारत काळाशी संबंधित अनेक कथाही इथले लोक पर्यटकांना सांगतात.

Travel Blog on Mahabharat characters
Travel Blog on Mahabharat characters

कलाप हे गाव विश्रांतीासाठी परफेक्ट आहे. इथे तुम्हाला वाहनांचा आवाज किंवा शहरी वर्दळ दिसणार नाही. गढवालच्या तुन्स व्हॅलीमध्ये असलेल्या या गावात कर्णाला समर्पित मंदिर, उंच आणि घनदाट देवदार वृक्षांमध्ये दडलेले आहे.

Travel Blog on Mahabharat characters
Travel Blog on Mahabharat characters

इथल्या टेकड्याही खूप सुंदर आहेत. त्या टेकड्यांमध्ये फिरताना तुम्हाला ताजी हवा मिळेल. गावात कर्णाचे मंदिर आहे. दर 10 वर्षांनी जानेवारी महिन्यात येथे कर्ण महाराज उत्सव साजरा केला जातो. या वेळी पांडव नृत्याचेही आयोजन केले जाते.

Travel Blog on Mahabharat characters
Winter Travel : हिवाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी मुळीच विसरू नका

'कलाप' गाव धाडसी लोकांसाठी खास आहे. पौराणिक गोष्टींसोबतच हे गाव तुम्हाला रोमांचित करेल. तुम्ही येथे कॅम्पिंग, ट्रेकिंग, नेचर वॉक, पक्षी निरीक्षण करू शकता.

रुपीन नदीच्या काठावर वसलेले हे गाव 7800 फूट उंचीवर आहे. येथील लोक उदरनिर्वाहासाठी शेती करतात. काही गावकऱ्यांना पर्यटकांकडून उत्पन्नही मिळते. येथे राहण्यासाठी तुम्ही गावात बांधलेल्या होम स्टेमध्ये राहू शकता.

Travel Blog on Mahabharat characters
Railway Travel : भारतातील या ट्रेन्स आतून आहेत हॉटेलसारख्या पॉश
Uttarakhand tourism places
Uttarakhand tourism places

तुम्ही बंदरपूंच पर्वताचे नाव ऐकले असेलच. या गावातून पर्वताचे वरचे शिखरही दिसते. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्यही अप्रतिम असते. त्यामूळे तूम्हालाही अशा या खास गावाची सफर करायची असेल तर कलापला नक्की भेट देऊ शकता.

Travel Blog on Mahabharat characters
Travelling Tips : प्रेग्नेंसीत प्रवास करायचाय? या टिप्स फॉलो करा अन् बिंधास्त रहा!
uttarakhand tourism places
uttarakhand tourism places

कसे पोहोचायचे?

'कलाप' गाव, दिल्लीपासून 450 किमी. अंतरावर आहे. तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला येथून 200 किमी अंतरावर असलेल्या डेहराडूनला पोहोचावे लागेल. डेहराडूनला पोहोचल्यानंतर तुम्ही टॅक्सी किंवा स्वतःच्या कारने जाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com