esakal | Nokia चा प्रत्येकाला परवडेल असा स्मार्टफोन Nokia C01 Plus लॉंच
sakal

बोलून बातमी शोधा

Nokia C01 Plus

Nokia चा प्रत्येकाला परवडेल असा स्मार्टफोन Nokia C01 Plus लॉंच

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नोकियाने आपला सर्वात किफायतशीर एंट्री लेव्हल स्मार्टफोन Nokia C01 Plus भारतात लॉन्च केला आहे. Nokia C01 Plus या स्मार्टफोनची थेट स्पर्धा ही जिओफोन नेक्स्टशी होणार असून हा स्मार्टफोन फक्त 5999 रुपयांच्या किंमतीसह लॉंच करण्यात आला आहे. ग्राहकांना हा नोकियाचा स्वस्त फोन सर्व रिटेल स्टोअर्स, नोकिया डॉट कॉम आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार आहे. ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असलेला हा स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार, नवीन नोकिया C01 प्लस जे ग्राहक फीचर फोन वापरत आहेत आणि त्यांना स्मार्टफोन खरेदी करायचा आहे अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. नोकीयच्या या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच HD + डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये 1.6 Ghz ऑक्टा-कोर प्रोसेसर सपोर्ट मिळेल. फोनच्या मागील पॅनलवर 5MP HDR रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर समोर 2MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो फ्लॅश सपोर्टसह येतो. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 11 (गो एडिशन) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. पॉवर बॅकअप साठी फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की फोन एका चार्जमध्ये एक दिवस बॅटरी लाईफ मिळेल. नोकिया सी 01 प्लस स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

हेही वाचा: 15 हजारांपेक्षा कमीत मिळतात Redmi चे 'हे' स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

loading image
go to top