esakal | 15 हजारांपेक्षा कमीत मिळतात Redmi चे 'हे' स्मार्टफोन, पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi

15 हजारांपेक्षा कमीत मिळतात Redmi चे 'हे' स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मोबाईल स्मार्टफोन बनववणारी कंपनी शाओमीने रेडमी ब्रँडअंतर्गत अनेक दर्जेदार स्मार्टफोन्स लॉंचे केले आहेत. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला रेडमीचे अनेक दर्जेदार फोनचे ऑप्शन्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये Redmi Note 10T 5G , Redmi Note 10S , Redmi 10 Prime , Redmi Note 10 , Redmi 9, Redmi 9 Power हे सर्वोत्तम पर्याय आहेत. आज आपण 15 हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या रेडमीच्या काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

रेडमी नोट 10 टी 5 जी (Redmi Note 10T 5G)

Redmi Note 10T 5G मध्ये 6.50-इंच सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 असून या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सपोर्टसह MIUI 12 वर काम करतो. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दिले आहेय जे मायक्रो एसडी कार्डद्वारे 1000 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये f/1.79 अपर्चरसह 48-मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे . फोनची बॅटरी सपोर्टबद्दल 5000mAh ची आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन क्रोमियम व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, मेटॅलिक ब्लू आणि मिंट ग्रीन मध्ये उपलब्ध आहे. Redmi Note 10T 5G च्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे.

हेही वाचा: टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Punch लवकरच होणार लॉंच; पाहा फीचर्स

रेडमी नोट 10 एस (Redmi Note 10S)

Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 6.43-इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 असेल. या स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिले आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरांबद्दल सांगायचे झाल्यास मागील बाजूस f / 1.79 अपर्चरसह 64 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f / 2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा, f / 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि f / 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलचा चौथा कॅमेरा दिला असून फोनमध्ये f / 2.45 अपर्चरसह 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. बॅटरीच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच हा स्मार्टफोन आहे एक्वा ग्रीन, फ्रॉस्ट व्हाईट आणि शॅडो ब्लॅक मध्ये मिळेल. Redmi Note 10T च्या 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे.

रेडमी 10 प्राइम (Redmi 10 Prime)

Redmi 10 Prime मध्ये 6.50-इंच सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12.5 वर चालतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

Redmi 10 Prime स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/2.2 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन अॅस्ट्रल व्हाइट, Biforest White आणि Phantom Black या रंगामध्ये उपलब्ध असेल. Redmi 10 Prime च्या 4GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,499 रुपये आहे.

हेही वाचा: स्वस्तात मिळतात 'या' सनरुफ असलेल्या कार, पाहा किंमत आणि फीचर्स

रेडमी नोट 10 (Redmi Note 10)

ग्राहकांना रेडमी नोट 10 मध्ये 6.43 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझोल्यूशन 1080 पिक्सेल आहे. रेडमी नोट 10 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678G प्रोसेसर दिला असून फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सल, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये f/2.5 अपर्चरसह 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तसेच हा स्मार्टफोन MIUI 12 आधारित Android 11 वर काम करतो. तुम्हाला Aqua Green, Frost White आणि Shadow Black रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होईल. रेडमी 10 च्या 4GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये आहे.

रेडमी 9 (Redmi 9)

रेडमी 9 मध्ये 6.53-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून त्याचे रिझोल्यूशन 720x1600 पिक्सेल आहे. तसेच फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित MIUI 12 वर काम करतो. रोडमी 9 मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये f / 2.2 अपर्चरसह 13 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि f / 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी f / 2.2 अपर्चरसह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन कार्बन ब्लॅक, स्पोर्टी ऑरेंज आणि स्काय ब्लू मध्ये उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सोलेरोमीटर सेंसर आणि एंबियंट लाइट सेंसर दिले आहेत. 4GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज वेरियंट ची किंमत 9,499 रुपये आहे.

हेही वाचा: Apple चे नवीन आयफोन सीरिज उद्या होणार लाँच

रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power)

Redmi 9 Power मध्ये 6.53-इंच सुपर AMOLED डिस्प्ले दिला असून ज्याचे रिझोल्यूशन 1080x2340 आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर दिला आहे. रेडमी 9 पॉवर Android 10 वर चालतो. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सेल, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा चौथा कॅमेरादेण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन ब्लेझिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फायर रेड आणि मायटी ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. Redmi 9 Power च्या 4GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे.

loading image
go to top