ChatGPT : कंटेंट रायटर नव्हे, या २० प्रोफेशनचे जॉब्स धोक्यात... ChatGPT नेच सांगितले उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chat GPT Jobs

ChatGPT : कंटेंट रायटर नव्हे, या २० प्रोफेशनचे जॉब्स धोक्यात... ChatGPT नेच सांगितले उत्तर

Chat GPT Jobs : Chat GPT बद्दल कळल्यापासून अनेक लोकं धास्तावले आहेत, कारण आता तो अनेकांचे जॉब खाईल यात काहीही शंका नाही, सर्वांच्या म्हणण्यानुसार यात सर्वात पहिला नंबर येतो तो कंटेंट रायटर्सचा, पण आत्ता नवीन केलेल्या सर्व्हे नुसार कंटेंट रायटर सोडून या २० कंपनी प्रोफेशनला धक्का बसण्याचे दिसते आहे.

Resumebuilder.com ने १,००० व्यावसायिक नेत्यांसह एक सर्वेक्षण केले आणि असे आढळले की ChatGPT लागू केलेल्या यूएसमधील जवळपास निम्म्या कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी काढून तिथे AI आउटसोर्स वापरायला सुरुवात केली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त अमेरिकाच नाही तर जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटीमुळे नोकरी गमावण्याची भीती आहे.

सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे OpenAI ने ChatGPT चे नवीन वर्जन GPT 4 लॉन्च केले आहे. कंपनीचा दावा आहे की AI ChatGPT लोकांची जागा घेऊ शकत नाहीत. तर, ते लोकांना मदत करण्यासाठी बनवले गेले आहे.

दरम्यान, प्रशांत रंगास्वामी नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने GPT-4 ला २० प्रोफेशन बद्दल विचारले की ज्यांना ChatGPT रिप्लेस करु शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

डेटा एंट्री क्लर्क, कस्टमर सर्विस रिप्रेजेंटेटिव, प्रूफरीडर, पॅरालीगल, बुककीपर, ट्रांसलेटर, कॉपीरायटर, मार्केट रिसर्च अॅनालिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर, अपॉइंटमेंट शेड्यूलर, टेलीमार्केटर, व्हर्च्युअल असिस्टंट, ट्रान्सक्रिप्शनिस्ट, न्यूज रिपोर्टर, ट्रॅव्हल , ट्यूटर, टेक्निकल सपोर्ट एनालिस्ट ई-मेल मार्केटर, कंटेंट मॉडरेटर आणि रिक्रूटर

पण, तज्ञांचा असा विश्वास आहे की अजूनही ChatGPT ने माणसाची जागा घेतली नाहीये, ChatGPT जरी आपल्याला हवी असलेली माहिती देऊ शकत असला तरी त्याची गुणवत्ता फारच कमी दर्जाची आहे अन् याने कंपन्यांना फायदा होणार नाही.